Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय

हिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय
हिवाळ्यात त्वचाच नाही तर केसही ड्राय आणि बेजान होऊन जातात, आणि केसांना अतिरिक्त पोषणाची गरज असते. या मोसमध्ये केस गळणे एक मोठी समस्या आहे आणि यावर उपाय करणे आवश्यक आहे. जाणून घ्या याचे कारण आणि त्यावर उपाय.

कारणं- पोषणाची कमी एक मुख्य कारण आहे, याव्यतिरिक्त अजूनही काही कारणं आहे ज्यामुळे केस गळतात:

ताण
एनिमिया
केसांवर वेगवेगळे प्रयोग
व्हिटॅमिन बी ची कमतरता
प्रोटीनची कमतरता
हाइपो थॉयरॉडिज्म
डैंड्रफ
बोरिंगच्य पाण्याने केस धुणे
अनुवांशिक
केसांच्या मुळात इंफेक्शन
 
केस गळती थांबवण्यासाठी त्याचे कारण ओळखून आणि त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. आता जाणून घ्या 5 कारगर उपाय जे केस गळती थांबवण्यासाठी फायद्याचे सिद्ध होतील.
 
पुढे वाचा फायदे...

नारळ
केसांना पोषण देण्यात नारळ खूप उपयोगी आहे. नारळाचे तेल कोमट करून केसांच्या मुळात मसाज केल्याने पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात. तेल कमीत कमी एक तास तरी केसांमध्ये लावून ठेवावे. याव्यतिरिक्त नाराळाचे दूध केसांमध्ये लावून मसाज करून एक तासानंतर केस धुतल्याने फायदा होतो.
webdunia
जास्वंद
जास्वंदाचे लाल फूल केसांसाठी वरदान आहे. हे पिसून नारळाच्या तेलात मिसळून केसांना 1 तास तरी लावून ठेवावे. नंतर केस धुऊन याका. याने डैंड्रफपासून मुक्ती मिळते आणि केस चमकदार होतात.

अंडी
अंडी प्रोटीनने भरपूर असतात, याव्यतिरिक्त यात जिंक, मिनरल आणि सल्फर आढळतं. हे सर्व पोषक तत्व मिळून केसांना मजबूती प्रदान करतात आणि केस गळतीवर फायदा करतात. अंडीचा पांढरा भाग जैतूनच्या तेलात मिसळून डोक्याची मसाज करावी. अर्ध्या तासाने केस धुउन टाकावे.
 
कांदा
कांद्याचा रस केवळ केस गळणंच कमी होतं नाही तर नवीन केस येतात आणि केसांची लांबीही वाढते. आठवड्यातून दोनदा कांद्याचा रस केसांना लावावा आणि अर्ध्या तासाने शांपू करावा. हा खूप कारगर उपाय आहे.
webdunia
लसूण
सल्फरची अधिकतेमुळे लसूण केसांसाठी फायदेशीर आहे. लसणाला नारळाच्या तेलात शिजवून किंवा याचा रस नारळाच्या तेलात मिसळून लावल्याने फायदा होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्ध्या लिंबाचा रसाने थांबेल केस गळती, हे 5 बॉडी प्रॉब्लम्स देखील होतील दूर