Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डैंड्रफपासून नेहमीसाठी सुटकारा मिळवतो एलोवेरा (कोरफड)

डैंड्रफपासून नेहमीसाठी सुटकारा मिळवतो एलोवेरा (कोरफड)
ज्याच्या डोक्यात डैंड्रफ असतो त्याला बर्‍याचवेळा आपली मान खाली टाकावी लागते. डोक्यात पांढर्‍या रंगाचा कोंडा प्रत्येकाला दिसून येतो. जर तुमच्या डोक्यात कोंडा आहे आणि तुम्ही हजारो शँपू आणि तेल लावून लावून त्रस्त झाले असाल तर, एलोवेरा ट्राय करा.  
 
एलोवेरा जेल डोक्याच्या त्वचेला नमी पोहोचवते, ज्यामुळे डोक्यातील ड्रायनेस पूर्णपणे ठीक होण्यास मदत मिळते. कोंडा एक प्रकारचा फंगस फैलवते म्हणून आम्ही तुम्हाला एलोवेरा जेलमध्ये काही वस्तू मिसळायला सांगू जे या फंगसाचा पूर्णपणे सफाया करून देईल.  
 
एलोवेरा जेलच्या मदतीने तुम्हाला कोंड्यामुळे होणार्‍या खाजेेपासून सुटकारा मिळेल. तर जाणून घेऊ कोंड्याला एलोवेरा जेलच्या मदतीने कसे दूर करू शकता.  
 
ताजे एलोवेरा जेल   
याला प्रयोग करण्यासाठी एलोवेराच्या झाडापासून 3 चमचे एलोवेरा जेल काढा आणि बोटांनी आपल्या डोक्याच्या स्कलवर लावा. असे केल्याने डोक्याला नमी मिळेल. याने डोक्याची मसाज करा आणि रात्रभर तसेच ठेवा व सकाळी शँपूने डोकं धुऊन घ्या.
webdunia
एलोवेरा जेल आणि टी ट्री ऑइल 
जर एलोवेरासोबत टी ट्री मिसळलं तर याचे गुण दुप्पट होतात. टी ट्री ऑयलमध्ये जंतूंना मारण्याची शक्ती असते. हे तेल एंटीबॅक्‍टीरियल गुणांनी भरलेले असते व कोंड्यापासून मुक्ती मिळवतो. या पेस्टला बनवण्यासाठी एका लहान वाटीत 3 चमचे एलोवेरा जेलमध्ये 5-7 थेंब टी ट्री ऑइल मिक्स करा. या पेस्टला डोक्यावर लावा आणि रात्रभर सोडून द्या. त्याला सकाळी पाण्याने धुऊन घ्या.
webdunia
एलोवेरा आणि कडूलिंबाचे तेल   
कडू लिंबाचे तेल एंटीबॅक्‍टीरियल आणि एंटी फंगल गुणांनी भरलेले आहे, जे तुम्हाला कोंड्यापासून मुक्ती मिळवून देईल. जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा प्रयोग कराल तर तुमच्या डोक्यातील कोंडा नेहमीसाठी दूर होईल. या पॅकला बनवण्यासाठी 2-3 चमचे एलोवेरा जेल मध्ये 10-12थेंब लिंबाचे तेल मिसळा. मग त्याला डोक्यात रात्रभर लावून ठेवा. नंतर त्याला सकाळी पाण्याने धुऊन घ्या.
webdunia
एलोवेरा आणि कापूर  
सर्वात आधी कापुराची पूड करा. 3 चमचे एलोवेरामध्ये अर्धा चमचा कापूर पूड मिक्स करा. या मिश्रणाला आपल्या डोक्यात लावा आणि 2 मिनिटापर्यंत मसाज करून 1 तासासाठी सोडून द्या. या नंतर तुम्ही तुमच्या डोक्याला साद्या पाण्याने धुऊन घ्या. तुम्हाला वाटत असेल तर या पेस्टला रात्रभर लावून सोडू शकता.   
 
webdunia
एलोवेरा जेल आणि लिंबाचा रस   
एक दुसरी पेस्ट म्हणजे एलोवेरा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण. लिंबू एक प्राकृतिक ऍसिड आहे जो कोंडा उत्पन्न करणार्‍या फंगसचा सफाया करतो. या पेस्टला तयार करण्यासाठी 3 चमचे एलोवेरा जेलमध्ये 2 चमचे लिंबाचा रस मिसळा. नंतर बोटांनी याला स्कलपर्यंत लावून मसाज करा. रात्रभर त्याला तसेच राहू द्या आणि सकाळी केस धुऊन टाका.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जमाना मिशा आणि दाढीचा