Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘टेस्ला’ने फेसबुकवरील पेज बंद केले

‘टेस्ला’ने फेसबुकवरील पेज बंद केले
, शनिवार, 24 मार्च 2018 (09:20 IST)

अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ या कंपन्याचे फेसबुकवरील पेज बंद केले आहेत.

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर ट्विटरवर एका युजरने इलॉन मस्क यांना फेसबुकवरील ‘स्पेस एक्स’चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. मस्क यांनी देखील काही वेळातच फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला दणका दिला. ‘आम्ही फेसबुकसोबत कधीही जाहिरात केलेली नाही. आमची खोटी जाहिरात करण्यासाठी आम्ही कोणाला सांगत नाही किंवा आम्ही त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही त्यांच्या दर्जामुळेच चालतात, असे त्यांनी सांगितले. फेसबुकवरील पेज डिलिट केल्याने कंपनीला मोठा फटका बसेल असे काही नाही, असंही मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या फेसबुकवरील पेजला लाखो युजर्सनी लाईक केले होते.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया