Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिंद्राच्या शार्क सारख्या ‘मराझ्झो’या प्रवासी श्रेणीतील कारचे ग्लोबल लॉच

महिंद्राच्या शार्क सारख्या ‘मराझ्झो’या प्रवासी श्रेणीतील कारचे ग्लोबल लॉच
, मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (09:28 IST)
देशातील उत्सवांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी  विविध वाहन उत्पादक कंपन्या ही त्यांच्या कारचे नवनवीन मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय कंपनी असलेल्या महिंद्राने ‘मराझ्झो’या प्रवसी श्रेणीतील कारचे दिमाखदार सादरीकरण करत तिचे आधिकारीक लॉन्चींग केले आहे. तर आता ही प्रवासी उत्तम कार बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
 
नाशिक येथील सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका, वाहन विभागाचे अध्यक्ष राजन वडेरा यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला आहे. महिंद्राची ‘मराझ्झो’वेगवेगळ्या श्रेणीत सादर करण्यात आली. तर तिची किंमत प्रथम भाग नऊ लाख ९९ हजार ते १३ लाख ९० रुपयांपर्यंत असल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. इको ड्रायव्हिंग मोड, लेदर सीट, टचस्क्रीन एन्फोऐंटेटंमेंट सिस्टीम अशा विविध सुविधा आहेत. 
 
नाशिकमध्ये महिंद्राच्या कारखान्यात निर्मिती होणार्‍या बोलेरो, झायलो, स्कॉर्पिओ या वाहनांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नव्याने येऊ घातलेल्या इलेक्ट्रिक कार ‘इ-व्हेरिटो’चे उत्पादनही नाशिकमध्ये वेगाने सुरू केली आहे. नव्या मरोझ्झोच्या निर्मितीमुळे राज्यातील वाहननिर्मिती प्रक्रियेला चालना मिळणार असे चित्र आहे. महिंद्राच्या नाशिकसह चेन्नई, अमेरिकेतील महिंद्रा ऑटोमोटिव्ह अमेरिका(माना) आणि महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही), डेट्राइटची इंजिनिअरिंग टीम आणि इटलीच्या पिनिनफरीनाच्या संयुक्त प्रयत्नातून मराझ्झोच्या निर्मिती झाली आहे. त्यामुळे आता इनोव्हा साठी मोठी टक्कर निर्माण झाली आहे. तर ही कार शार्क माशाप्रमाणे दिसणारी ‘मराझ्झो’जलद आणि टिकावू असून, कुटुंबासाठी एक परिपूर्ण कार आहे, तिच्यातून सात ते आठ व्यक्ती आरामात प्रवास करू शकतात. सुरक्षा आणि आधुनिक तेच्या सर्वसुविधांनी युक्त ही कार शार्कप्रमाणेच दीर्घकाळ टिकणारी आहे असे मत आनंद महिद्र यांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण देशातून माध्यम प्रतिनिधी या सोहळयासाठी आले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुर्दैवी आजारी आईचा केला मुलाने केली हत्या