Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेट्रोलच्या दाराच्या भडक्याने महाराष्ट्रातील जनता त्रस्त, अमरावतीत देशातील विक्रमी दर

पेट्रोलच्या दाराच्या भडक्याने महाराष्ट्रातील जनता त्रस्त, अमरावतीत देशातील विक्रमी दर
पेट्रोल आणि डीजेल यांची रोज होणारी दरवाढ यामुळे महाराष्ट्रातील जनता त्रस्त झाली आहे.  कर्नाटक निवडणुकीनंतर आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. म्हणजेच निवडणुका पुरते दर वाढले नाहीत असा रोष नागरिकांमध्ये  निर्माण झाला आहे, तर सोशल मिडीयावर विरोधात असतांना भाजपा नेते कसे पेट्रोल दरवाढीवर बोलत होते अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी वाद प्रतिवाद देखील होवू घातला आहे. मात्र सरकार कोणत्याही प्रकारे दर कमी करताना दिसत नाही. याचा फटका वाहतूक व्यवस्था, शेतकरी वर्गाला देखील बसला आहे.

बाजारात सध्या एक कॅॅरेट नेतांना १७ ते १८ रुपये लागत असून पूर्वी त्याचा दर १३ ते १४ रुपये होता, त्यामुळे भाजीपाला देखील महाग झाला आहे. याचा सर्वार्थाने फटका सामन्य माणसाला बसला आहे. आज पेट्रोल 36 पैशांनी तर  डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.  अमरावती येथे ८६.९८ रुपये लिटर पेट्रोल  डिझेल ७४.४४  रुपये आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता मावळली आहे. सोईसुविधांसाठी दरवाढ होतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. 

Petrol Diesel price in Mumbai - For Last 1 week

DATE PETROL PRICE / LIT CHANGE DIESEL PRICE / LIT CHANGE
25-05-2018 ₹ 85.65 ₹ 0.36 ₹ 73.20 ₹ 0.24
24-05-2018 ₹ 85.29 ₹ 0.3 ₹ 72.96 ₹ 0.2
23-05-2018 ₹ 84.99 ₹ 0.29 ₹ 72.76 ₹ 0.28
22-05-2018 ₹ 84.70 ₹ 0.3 ₹ 72.48 ₹ 0.27
21-05-2018 ₹ 84.40 ₹ 0.33 ₹ 72.21 ₹ 0.27
20-05-2018 ₹ 84.07 ₹ 0.32 ₹ 71.94 ₹ 0.27
19-05-2018 ₹ 83.75 ₹ 0.3 ₹ 71.67 ₹ 0.25
18-05-2018 ₹ 83.45 ₹ 0.29 ₹ 71.42 ₹ 0.3
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्नीसोबतचा डीपी ठेवला नाही, केली पोलीसात तक्रार