Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jio ने JioPhone आणि JioPhone 2 ग्राहकांसाठी JioRail एप लॉन्च केला

Jio ने JioPhone आणि JioPhone 2 ग्राहकांसाठी JioRail एप लॉन्च केला
नवी दिल्ली , सोमवार, 28 जानेवारी 2019 (12:25 IST)
रेलवे तिकिट बुकिंग, कँसिल, तत्काल आणि PNR स्टेट्स बस एका क्लिक वर
देशात प्रथमच असे होणार आहे की जेव्हा ग्राहक एखाद्या फीचर फोनच्या माध्यमाने रेल तिकिट बुक करू शकतील. रिलायंस जियोच्या  4जी वोल्टी फीचरफोन जियोफोनवर आता ग्राहक IRCTC ची रेल्वे तिकिट बुकिंग सेवेचा उपयोग करत रेल्वे तिकिट बुक करू शकतात. त्यासाठी रिलायंस जियोने  JioRail नावाचा एक खास एप लॉन्च केला आहे. JioRail एप सध्या जियोफोन आणि जियोफोन 2च्या ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे.
 
JioRail ऐपच्या माध्यमाने ग्राहक तिकिट बुक करवू शकतात तसेच रद्द देखील करू शकतील. रेल्वे तिकिट भुगतानसाठी ग्राहक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इ-वॉलेटचा प्रयोग करू शकतात. त्याशिवाय PNR स्टेट्स चेकिंग, ट्रेन टाइमिंग, ट्रेन रूट्स आणि सीट उपलब्धतेबद्दल देखील JioRail ऐपहून माहिती घेऊ शकतात.
 
स्मार्टफोनसाठी बनलेले IRCTC च्या ऐपप्रमाणे JioRail ऐपच्या माध्यमाने देखील ग्राहक तत्काल बुकिंग करू शकतील. जियोफोनच्या ज्या ग्राहकांजवळ IRCTCचे    एकाउंट नाही आहे ते JioRail ऐपचा वापर नवीन एकाउंट बनवून करू शकतात. PNR स्टेट्स चेंज अलर्ट, ट्रेन लोकेटर आणि फूड आर्डर सारखी सेवा देखील JioRail ऐपवर लवकरच आणण्याचा प्लान आहे. JioRail एप तिकिट बुकिंगला फारच सोपे बनवून देईल. जियोफोन ग्राहकांना तिकिट बुकिंगसाठी लांब लांब लाइन आणि ऐजेंटपासून मुक्ती मिळेल.
 
रिलायंस जियो, रेल्वेचे ऑफिशियल सर्विस प्रोवायडर आहे. ऑफिशियल सर्विस प्रोवायडर बनण्याच्या रेसमध्ये रिलायंस जियोने काही दिवसाअगोदर एयरटेलला मात दिली  होती. रेल्वेसोबत आपली भागीदारी पुढेवाढवत रिलायंस जियोने नवीन JioRail एप लॉचं केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'नारीशक्ती' शब्द वर्ड ऑफ द इयर, ऑक्सफर्डची घोषणा