Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोमॅटोकडून खाद्यपदार्थ ऑर्डर करणे झाले महाग, प्लॅटफॉर्म फी 25 टक्क्यांनी वाढवली

झोमॅटोकडून खाद्यपदार्थ ऑर्डर करणे झाले महाग, प्लॅटफॉर्म फी 25 टक्क्यांनी वाढवली
, सोमवार, 22 एप्रिल 2024 (12:25 IST)
आजकाल सर्व जण ऑनलाईन फूड मागवतात. काहीही खाण्यासाठी मागवायचे असेल तर झोमॅटोवरून ऑर्डर देऊन मागवता येते. पण आता ऑनलाईन ऑर्डर करणे महाग झाले आहे. 

भारतातील निवडक ग्राहकांसाठी झोमॅटोकडून खाद्यपदार्थ ऑर्डर करणे महाग झाले आहे. कंपनीने प्लॅटफॉर्म फी 25 टक्क्यांनी वाढवली आहे.या मुळे आता ग्राहकांना खाद्यपदार्थाचे ऑनलाईन ऑर्डर करताना जास्तीचे प्लॅटफॉर्म चार्ज द्यावे लागतील.वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने प्लॅटफॉर्म फी चार्जेस 3 रुपयांवरून 4 रुपये केले होते. आता प्लॅटफॉर्म फी 25 टक्क्याने वाढवली आहे. आता ग्राहकांना प्रति ऑर्डरसाठी 5 रुपये मोजावे लागतील. 
डिलिव्हरी शुल्काव्यतिरिक्त, झोमॅटो आपल्या ग्राहकांकडून प्लॅटफॉर्म फी देखील घेते. तथापि, झोमॅटो गोल्ड लॉयल्टी प्रोग्राम वापरकर्त्यांना वितरण शुल्क भरण्याची आवश्यकता नाही, परंतु त्यांना प्लॅटफॉर्म शुल्क भरावे लागेल. अशा परिस्थितीत गोल्ड मेम्बरसाठी जेवणाची ऑर्डर 5 रुपयांनी महाग होऊ शकते.
 
Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चॉकलेट खाल्ल्याने १८ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, विषारी पदार्थ खाल्ल्याने आजारी पडल्याचे तपासात उघड !