Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Merry Christmas 2021 : 'मेरी' हा शब्द कुठून आला हे जाणून घ्या, हॅप्पी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हटले जाते?

Merry Christmas 2021 : 'मेरी' हा शब्द कुठून आला हे जाणून घ्या, हॅप्पी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हटले जाते?
, बुधवार, 22 डिसेंबर 2021 (17:13 IST)
डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवटचा महिना आहे. वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात वर्षातील शेवटचा मोठा सण येतो ज्याची जगातील अनेक देशांमधील लोक वाट बघत असतात. डिसेंबर जवळ आला की लोकांची प्रतीक्षा संपुष्टात येऊ लागते. ख्रिसमस डे दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. बहुतेक मुले ख्रिसमसच्या दिवसाची वाट पाहत असतात. हा विशेष सण येशूच्या वाढदिवसानिमित्त होतो, ज्यामध्ये सांताक्लॉज मुलांसाठी भेटवस्तू आणतात. यावेळी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. पण इतर सणांप्रमाणे आपण नाताळमध्ये हॅप्पी ख्रिसमस म्हणत नाही तर मेरी ख्रिसमस म्हणतो हे कधी लक्षात आलं आहे का? शेवटी, दिवाळीच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा किंवा हॅप्पी ईस्टरसारखे आपण हॅपी ख्रिसमस का म्हणत नाही? मेरी या शब्दाचा अर्थ काय आहे आणि ख्रिसमसमध्ये हॅपी ऐवजी मेरी हा शब्द का वापरला जातो? ख्रिसमसमध्ये मेरीचा अर्थ जाणून घेऊया.
 
मेरी म्हणजे काय?
मेरीचा अर्थ आनंदी, सुखी असा आहे. मेरी हा शब्द जर्मनिक आणि ओल्ड इंग्लिशचा मिलाफ आहे. सोप्या शब्दात, मेरीचा अर्थ आणि हॅपीचा अर्थ एकच आहे. पण ख्रिसमसमध्ये हॅप्पीऐवजी मेरी हा शब्द वापरला जातो.
 
हॅप्पी ऐवजी मेरी असे का म्हणतात?
मेरी हा शब्द प्रसिद्ध साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनी प्रचलित केला होता. त्यांनी त्यांच्या 'अ ख्रिसमस कॅरोल' या पुस्तकात मेरी हा शब्द सर्वाधिक वापरला, त्यानंतर हॅप्पीऐवजी मेरी हा शब्द वापरात आला. त्यापूर्वी लोक हॅपी ख्रिसमस म्हणायचे. इंग्लंडमध्ये आजही अनेक लोक मेरीऐवजी हॅप्पी ख्रिसमस म्हणतात. दोन्ही शब्द सारखेच आहेत पण मेरी हा शब्द प्रचलित आहे.
 
मेरी हा शब्द कुठून आला?
मेरी या शब्दाची उत्पत्ती 16 व्या शतकात झाली. त्यावेळी इंग्रजी भाषा बाल्यावस्थेत होती. नंतर 18व्या आणि 19व्या शतकात ते अधिक प्रचलित झाले. ख्रिसमस सह मेरी हॅप्पी पेक्षा जास्त वापरण्यात आलं. पण मेरी हा शब्द ख्रिसमसशिवाय इतर कोणत्याही सणात वापरला गेला नाही.
 
हॅपी ख्रिसमस म्हणा की मेरी ख्रिसमस?
जरी फक्त मेरी ख्रिसमस प्रचलित आहे आणि बहुतेक देशांमध्ये बहुतेक लोक मेरी ख्रिसमस म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात, परंतु आपण हैप्पी ख्रिसमस म्हटल्यास ते देखील चुकीचे ठरणार नाही. हॅप्पी ख्रिसमस आणि मेरी ख्रिसमसचा अर्थ एकच आहे, परंतु बहुतेक लोक मेरी या शब्दाच्या वापरामुळे, हॅपी ख्रिसमस म्हणणे अवघड जाते, परंतु ते चुकीचे नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Christmas Recipes : ख्रिसमस पार्टीसाठी झटपट बनवा बेक्ड पॉटेटो चिप्स