Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुबई गाजवणार अवधूत,श्रेयसचा मराठी 'जल्लोष'

दुबई गाजवणार अवधूत,श्रेयसचा मराठी 'जल्लोष'
, बुधवार, 12 डिसेंबर 2018 (14:39 IST)
अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट "जल्लोष २०१८". याच महिन्यात दुबईमध्ये रंगणार आहे. या कॉन्सर्ट मध्ये मराठीतील मैलाचा दगड ठरलेल्या आणि अविस्मरणीय अशा गाण्याचा समावेश असणार आहे. सोबतच या गाण्यांना थोडा 'फ्युजन टच' देखील असेल. या "जल्लोष २०१८" शो चे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक अवधूत गुप्ते आणि मराठी मधील पहिले रॅपर किंग जे डी म्हणजेच श्रेयस जाधव. अवधूत गुप्ते हे त्याच्या गाण्यांसोबतच झेंडा,मोरया या सारख्या गाजलेल्या चित्रपटासाठी देखील ओळखले जातात. तर दुसरीकडे श्रेयस जाधव हे मराठीतील पहिले रॅपर आहे. रॅपर म्हणून श्रेयस त्यांची अनेक गाजलेली गाणी आहे. पण याशिवाय त्यांची वेगळी ओळख म्हणजे त्यांनी मराठीत अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या दोन दिग्गज गायकांना एकाच स्टेज वर परफॉर्म करताना पाहण्याची अनोखी संधी दुबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. या सर्व गोष्टी मध्ये अजून एक सरप्राईझ पॅकेज म्हणजे आपल्या सगळ्याची लाडकी स्पृहा जोशी हिचे धमाकेदार सूत्रसंचालन. संगीताला भाषेचे बंधन नसते. म्हणूनच तर दुबई मध्ये होणाऱ्या मराठी मातीचा गंध असलेल्या या शो बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्याचमुळे  शो च्या तिकीट बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळतोय. येत्या २१ डिसेंबर ला होणारा हा भव्य शो गणराज असोसिएट्स, मिराकी इव्हेंट्स आणि मोरया इव्हेंट्स च्या सहयोगाने सादर करणार आहे.
webdunia

मराठी हि भाषा फक्त महाराष्ट्रा पुरताच मर्यादित नसून आता मराठी जागतिक स्तरावर ओळखली जाण्यामध्ये असे काही कॉन्सर्ट,मराठी चित्रपट यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. आणि असे म्हणतात ना ज्याचा शेवट गोड तर सगळेच गोड दुबई करांचा २०१८ वर्षाचा शेवट नक्कीच गोड होणार यात शंका नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा