Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाण्याचं महत्त्व पटवून देणारा एक होतं पाणी लवकरच रसिकांच्या भेटीला

पाण्याचं महत्त्व पटवून देणारा एक होतं पाणी लवकरच रसिकांच्या भेटीला
, शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (15:21 IST)
मराठीत दिवसागणिक नवनवीन आशयघन आणि सामाजिक विषयांवरील सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमांमधून अनेक लेखक,दिग्दर्शक आणि कलाकारांची फौज मराठी चित्रपटसृष्टीला मिळत आहे.लवकरच अशाच एका ताज्या दमाच्या मंडळींचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव *‘एक होतं पाणी’* असं आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. या सिनेमातून एक नवा चेहरा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या अभिनेत्रीचे नाव *श्रिया मस्तेकर* असं आहे. श्रियाच्या डबिंगचं काम पूर्ण झाल्याची माहिती लेखक *आशिष निनगुरकर* यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. यावेळचा एक फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. या फोटोत *आशिष निनगुरकर, दिग्दर्शक रोहन सातघरे आणि अभिनेत्री श्रिया मस्तेकर* पाहायला मिळत आहे. सामाजिक विषयाला हात घालणारा *'एक होतं पाणी'* हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे. 

सध्या मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घातला जातो आहे. अशाच एका सामाजिक विषयाला हात घालणारा 'एक होतं पाणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. सर्वत्रच दुष्काळाची परिस्थिती भीषण बनत चालली आहे...काही दुष्काळग्रस्त भागात तर दोन वेळचा खाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे.  या चित्रपटाला संगीत दिग्दर्शन विकास जोशी यांचे असून रोहित राऊत, आनंदी जोशी,ऋषिकेश रानडे यांनी गाणी गायली आहेत. *विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ* हे सिनेमाचे निर्माते आहेत. *आशिष निनगुरकर* लिखित या सिनेमाचे छायाचित्रण *योगेश अंधारे* यांनी केले आहेत. हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, आशिष निनगुरकर,रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, वर्षा पाटणकर,राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्न....?