Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs PAK : सुपर-4 मध्ये भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला

IND vs PAK : सुपर-4 मध्ये भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला
, सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (23:11 IST)
India vs Pakistan Asia Cup 2023:  भारताने आशिया कपच्या सुपर-4 मध्ये पाकिस्तानचा 229 धावांनी पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेला सामना दोन दिवसांत संपला. रविवारी (10 सप्टेंबर) सामना सुरू झाला, मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. खेळ थांबला तोपर्यंत भारताने 24.1 षटकात 147 धावा केल्या होत्या. सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस होता. पुढे खेळताना भारतीय संघाने 50 षटकात 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला 32 षटकांत आठ गडी गमावून केवळ 128 धावा करता आल्या. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. अशा प्रकारे टीम इंडियाने 228 धावांनी विजय मिळवला.
 
भारतीय संघाने पाकिस्तानवर २२८ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2008 च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या मीरपूरमध्ये 140 धावांनी त्यांचा पराभव केला होता.
 
भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळीमुळे दोन गडी गमावून 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ विकेट्सवर केवळ 128 धावा करू शकला आणि सामना 228 धावांनी गमावला. दुखापतग्रस्त हरिस रौफ आणि नसीम शाह फलंदाजीला आले नाहीत. अशा स्थितीत पाकिस्तान संघाला 32 षटकात 8 विकेट गमावत केवळ 128 धावा करता आल्या.
 
Edited by - Priya Dixit    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs PAK: विराट कोहलीने ODI मध्ये सर्वात कमी डावात 13 हजार धावा करून तोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम