Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएल ओपनिंग नाईटची जय्यत तयारी

आयपीएल ओपनिंग नाईटची जय्यत तयारी
, बुधवार, 4 एप्रिल 2018 (12:51 IST)
क्रिकेटप्रेमींना सर्वात आवडीची स्पर्धा असलेली इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल लवकरच सुरु होत आहे. भारत तसेच भारताबाहेरचे क्रिकेटपटू या सामन्यांमध्ये सहभागी असतात. लीगमधील सामन्यांकडे जसे सर्वांचे लक्ष असते त्याचप्रमाणे सर्वांचे लक्ष त्याच्या उदघाटन सोहळ्याकडेदेखील असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील आयपीएल २०१८ चा उद्घाटन सोहळा नयनरम्य असणार आहे. गतवर्षी दिशा पटानी, टायगर श्रॉफ, हर्षदीप कौर, रितेश देशमुख सारख्या अनेक सिनेकलाकारांनी आपल्या परफॉर्मन्सने सोहळ्याला चार चांद लावले होते. दरवर्षी या उद्घाटन सोहळ्यात एखादा परफॉर्मन्स दिला जातो, ज्यात अनेक कलाकार मंडळी थिरकतात. यावर्षीही यो सोहळ्यात कोणते कलाकार हजेरी लावणार आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
 
लवकरच सुरु होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्याचा उदघाटन सोहळा यंदा खुप स्पेशल असणार आहे. कारण या सोहळ्याचे नृत्यदिग्दर्शन आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शक शामक दावर करणार आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन या सोहळ्यात परफॉर्म करणार आहे. नृत्यदिग्दर्शक शामक दावर हे त्यांच्या उत्तम नृत्यशैली आणि नृत्यसंदर्भातील अनोख्या प्रयोगासाठी ओळखले जातात. "शामक डान्स स्टाईल" ही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. अभिनेता हृतिक रोशन हा देखील त्याच्या हटके डान्समुळेच ओळखला जातो.
 
शामक आणि हृतिक या दोघांनी याआधी धूम २ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलेले आहे. तसेच अनेक अवार्ड्स शो मध्येही दोघांनी एकत्रितपणे काम केले आहे. नृत्यदिग्दर्शक शामक दावरने पुन्हा एकदा हृतिकसोबत काम करत असल्याची बातमी त्याच्या सोशल मीडियावरून नुकतीच दिली आहे आणि म्हणूनच यावर्षी हृतिक आणि शामक हे दोघे एकत्र येणार ही बातमीच आपल्याला एका शानदार सोहळ्याची चाहूल देणारी वाटते.
webdunia
दिल तो पागल है या चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात करणारे शामक दावर यांनी अनेक चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. मराठी चित्रपट "हृदयांतर" हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. नुकताच पार पडलेल्या स्टार स्क्रीन अवॉर्ड्स २०१७ च्या दिमाखदार सोहळ्यात शामकला सिनेमा जग्गा जासूस मधील "उल्लू का पठ्ठा" या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ठ नृत्यदिग्दर्शनाचा मिळाला. २०१८ सालच्या आयपीएलच्या या दिमाखदार सोहळ्याची भारतासह संपूर्ण विश्वाला उत्सुकता लागली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युनायटेड बॅंकची वर्ल्डलाईनशी हातमिळवणी