Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

T20 World Cup 2024: ऋषभ पंत खेळणार T20 विश्वचषक 2024!

rishbh pant
, मंगळवार, 12 मार्च 2024 (09:43 IST)
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दमदार फलंदाजीमुळे पराभूत झालेल्या सामन्यांमध्येही भारताला विजय मिळवून दिला आहे. भारतीय संघात पंतच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ऋषभ पंतच्या पुनरागमनाची प्रतीक्षा 2024 च्या T20 विश्वचषकात संपुष्टात येऊ शकते.

खुद्द बीसीसीआय सचिवांनी ही माहिती दिली आहे.पंतचा डिसेंबर 2022 मध्ये धोकादायक अपघात झाला होता. ज्यात तो थोडक्यात बचावला. अपघातानंतर पंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसनावर होता, परंतु आता तो आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन करणार आहे. यावेळी पंत दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारणार आहे.

यावेळी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जून महिन्यात यूएसए आणि वेस्ट इंडीज यांच्या संयुक्त विद्यमाने खेळला जाईल, परंतु त्यापूर्वी आयपीएल 2024 भारतात सुरू होईल. ज्यामध्ये ऋषभ पंत खेळताना दिसणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ऋषभ पंत चांगली फलंदाजी करत आहे. त्यांच्या प्रकृतीतही बरीच सुधारणा होत आहे.

जय शाह पंतबद्दल म्हणाले की, जर ऋषभ पंत आमच्यासाठी टी-20 विश्वचषक 2024 खेळू शकत असेल तर ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, परंतु सचिव जय शाह यांनी असेही सांगितले की आयपीएल 2024 दरम्यान त्याची कामगिरी कशी आहे हे देखील पहावे लागेल. म्हणजेच पंतने आयपीएल 2024 मध्ये चांगले परफॉर्मेंस दाखवले  तर तो जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसू शकतो. आयपीएलमध्ये विकेटकीपिंग कसे केले जाते हे पाहणे रंजक ठरेल असेही जय शाह म्हणाले.

ऋषभ पंतने नोव्हेंबर2022 मध्ये भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांच्या कारला अपघात झालापंतने भारतासाठी 66 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 987 धावा केल्या आहेत. या काळात ऋषभ पंतची सरासरी 22.43 होती. तर त्याचा स्ट्राइक रेट 126.37 होता.
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Paris Olympics 2024: विनेश फोगटचा राष्ट्रीय चाचण्यांमध्ये पराभव