Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन व विनोद चे क्रिकेट आद्य गुरु आचरेकर यांचे निधन

सचिन व विनोद चे क्रिकेट आद्य गुरु  आचरेकर यांचे निधन
मुंबई , गुरूवार, 3 जानेवारी 2019 (09:17 IST)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.1932 सालचा त्यांचा जन्म. त्यांनी 1943 साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी यंग महाराष्ट्रा एकादश. गुल मोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी केवळ एक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. 1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता.तेंडुलकर आणि कांबळी यांनी नुकतेय एका क्रिकेट प्रशिक्षण वर्गाची सुरुवात केली आणि ती सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आचरेकर सरांचा आशीर्वाद घेतला होता. त्यांची ती भेट शेवटची ठरली. बीसीसीआयनेही यानंतर ट्विट करुन रमाकांत आचरेकर यांना आदरांजली वाहिलेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ख्रिसमस सुट्टी : साई बाबा दर्शन संस्थानाला तब्बल 18 कोटींच्या देणग्या