Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय बोलिंग अटैक आपल्या प्रदर्शनाने हल्ला मचावायला तयार आहे

भारतीय बोलिंग अटैक आपल्या प्रदर्शनाने हल्ला मचावायला तयार आहे
, गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (12:44 IST)
टीम इंडियाच्या मजबूत बोलिंग अटैकने भारतीय टीमने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला त्यांच्याच घरी पराभूत करून त्यांना अचंभित केलं. एक वेळी जेव्हा टीम इंडियाचा गोलंदाजी विभाग अतिशय मंद असायचा, तर आज या भारतीय टीममध्ये असे-असे गोलंदाज आहे ज्यांच्या गतीने मोठे-मोठे फलंदाज चिंताग्रस्त होतात. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की गेल्या तीन वर्षांपासून भारतीय गोलंदाजांचे भविष्य चमकले आहे. 2016 पासून आजपर्यंतची आकडेवारी पाहिल्यास भारताचा बोलिंग अटैक सर्वात धोकादायक आहे.
 
ते बरोबर आहे की कोणत्याही गोलंदाजाची वास्तविक अग्नी परीक्षा टेस्ट क्रिकेटमध्ये विदेशी मातीवर होते. तथापि, या प्रकरणात भारतीय गोलंदाजांचा झंडा बुलंद आहे. गेल्या तीन वर्षात टीम इंडियाच्या गोलंदाजांची सरासरी 25 आहे, अर्थातच जगातील सर्वोत्तम. 
 
या यादीत टीम इंडियानंतर, दुसर्‍या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. घरगुती जमिनीवर तर दक्षिण आफ्रिकाच रेकॉर्ड अजून चांगला आहे, पण टीम इंडिया देखील जास्त मागे नाही आहे. मोठी गोष्ट म्हणजे, टीम इंडियाचे गोलंदाज घर आणि परदेशात दोन्ही जागी समान प्रदर्शन करीत आहे. 
 
2016 ते 2019 पर्यंतचे आकडा बघितला तर परदेशात सर्वाधिक विकेट घेतलेल्या शीर्ष 3 गोलंदाज भारतीय आहे. त्यातील टॉपवर जसप्रीत बुमरा आहे, ज्याने 20 डावांमध्ये 49 विकेट घेतले आहे. ईशांत शर्माने 26 डावांमध्ये 45 आणि शामीने 36 डावांमध्ये 68 विकेट घेतले आहे. 
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, परदेशात भारतीय स्पिनर्सचे प्रदर्शन देखील जोरदार राहिले आहे. आश्विनाने 26 डावांमध्ये 58 विकेट आणि जडेजाने 11 डावांमध्ये 30 विकेट घेतले आहे. स्पष्टपणे टीम इंडियाचा गोलंदाजी युनिट मजबूत असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेमध्ये कठोर लढा घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर त्याने इतिहास रचला आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजपथावर महिला बचतगटांचे प्रदर्शन