Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

WC 2023: पाकिस्तान विश्वचषकात या तारखेला भारताविरुद्ध खेळण्यासाठी तयार

WC 2023:  पाकिस्तान विश्वचषकात या तारखेला भारताविरुद्ध खेळण्यासाठी तयार
, बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (21:57 IST)
विश्वचषकातील सर्वात महत्त्वाच्या सामन्यांपैकी एक असलेला भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी आणि बीसीसीआयशी सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे याआधी दोन्ही संघांमधील हा सामना 15 ऑक्टोबरला होणार होता. मात्र, नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने सामन्याची तारीख एक दिवस आधी बदलण्यात आली.

तर पाकिस्तानच्या अजून एका सामन्याच्या तारीखात बदल करण्यात आले असून पाकिस्तान संघ हैदराबाद येथे 12 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबरला श्रीलंकाच्या विरोधात उतरणार. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तीन दिवसांचे अंतर राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
 
सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला उत्सवाच्या निमित्ताने तारीख बदलण्यास सांगितले होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुरक्षा पथके व्यस्त राहणार असल्याने सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था राखणे कठीण जाईल, असा युक्तिवाद एजन्सींनी केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) लवकरच याबाबत अपडेटेड वेळापत्रक जारी करू शकते.
 
विश्वचषकाचे सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. हैदराबाद व्यतिरिक्त, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत. या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. मुंबई आणि कोलकाता येथे सामने आहेत.
 


Edited by - Priya Dixit    
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता थेट अब्राहम लिंकनशी चैटिंग करू शकाल,मेटाचं नवीन AI चॅटबॉट लवकरच येणार