Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युवराजचा कोहलीला पाठिंबा

युवराजचा कोहलीला पाठिंबा
नवी दिल्ली , सोमवार, 27 मार्च 2017 (11:04 IST)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर बोचरी टीका करत  ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी त्याची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली. त्यांनतर कोहलीच्या समर्थनार्थ संपूर्ण भारतीय संघाने ऑस्ट्रे‍िलियातील माध्यमाविरोधात आवाज उठवला आहे. यामध्ये आता कोहलीचा संघ सहकारी व त्याचा चांगला मित्र असलेला युवराज सिंगने ऑस्ट्रेलियान माध्यमांवर तोंडसुख घेतले. ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून विराटची तुलना ट्रम्प यांच्याशी होणे ही कौतुकाची गोष्ट आहे. यातून ऑस्ट्रेलियाने कोहली सर्वोत्तम असल्याचे मान्य केले आहे. असे युवी म्हणाला. याआधी, चेतेश्वर पुजारानेही कोहलीच्या पाठीशी पूर्ण संघ उभा असल्याचे सांगत ऑस्ट्रेलियन माध्मयांनी केलेली टीका दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता ट्विंकल खन्नाने साधला योगी आदित्यनाथांवर निशाणा