Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
सिडनी , शनिवार, 23 जानेवारी 2016 (17:12 IST)
शेवटी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर पहिला विजय मिळाला. टीम इंडियासाठी मनीष पांडेयने आपल्या पहिला आंतरराष्ट्रीय शतक लावला जेव्हाकी रोहित शर्माने 99 आणि शिखर धवनने 78 धावांची खेळी खेळली. मनीषला त्याच्या शतकामुळे मॅन ऑफ द मॅच जेव्हाकी सीरीजमध्ये 400पेक्षा धावा काढणार्‍या रोहित शर्माला मॅन ऑफ द सीरीज निवडण्यात आले. आधी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने सात विकेटावर 330 धावा काढल्या होत्या. भारतासाठी या मॅचपासून पदार्पण करणारे जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी करत 10 षटकांमध्ये 40 धावा देऊन दोन विकेट घेतले, त्याशिवाय ईशांतने देखील दोन विकेट घेतले.  
 
पांडेयचा पहिला शकत, भारताचा पहिला विजय  
मनीष पांडेयने जबरदस्त फलंदाजी करत मार्शच्या चेंडूवर चौका लावून आपला पहिला वनडे शतक पूर्ण केला. पांडेयने 80 चेंडूंवर आठ चौके आणि एक षटकार लावून शतक लावला. शतक लावल्यानंतर पुढच्या चेंडूवर मनीषने दोन धावा काढून टीम इंडियाला 6 विकेटने विजय मिळवून दिला.  
 
आउट झाला धोनी
34 धावा काढून आउट झाला धोनी. मार्शच्या चेंडूवर वॉर्नरने घेतला कॅच  
 
मनीष पांडेयने चांगली फलंदाजी केली  
युवा फलंदाज मनीष पांडेयने जबरदस्त फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडिया 45 षटकांमध्ये तीन विकेट गमावून 285 धावा काढल्या. पांडेय 80 जेव्हाकी कर्णधार धोनी 16 धावांवर खेळत आहे.
 
ऑस्ट्रेलिया : ७ बाद ३३०; भारत : ४ बाद ३३१

Share this Story:

Follow Webdunia marathi