Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उंदीर पळवण्यासाठी अॅप

उंदीर पळवण्यासाठी अॅप
लंडन- उंदरांचा ससेमिरा टाळण्यासाठी आपण पिंजर्‍यापासून ते मांजर घरात आणण्यापर्यंत अनेक उपाय करीत असतो. काही देशांमध्ये तर उंदीर पकडून आणला तर ठराविक रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते, इतका उंदरांचा सुळसुळाट आहे. शेतकर्‍यांचा तर हा मोठाच शत्रू. 
 
अशाच उंदरांचा नायनाट करण्याचे अनेक उपाय सध्याच्या हायटेक जमान्यातही शोधले जात आहेत. आता चक्क मोबाईद्वारे आपण घरातले उंदीर घालवू शकतो. विश्वास बसत नसला तरी असा अॅप खरच बनवण्यात आला आहे. आता मोबाईलचे असे अॅप आले आहे ज्याने काही सेकंदातच घरातले उंदीर बाहेर पळून जातील. 
 
अॅन्टी-रॅट सोनारक असे या अॅपचे नाव आहे. उंदरांना पळवण्यासाठी तुम्हाला हा अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावा लागतो. गुगल प्ले स्टोअरमधून तुम्ही हा अॅप मोफत डाउनलोड करु शकता. हा अॅप बनवणार्‍यांचा असा दावा आहे की तब्बल 10 वर्षांच्या रिसर्चनंतर हा अॅप बनवण्यात आला आहे. तेऐकताच उंदीर बाहेर येतात. जास्त आवाज असणार्‍या ठिकाणी हा अॅप काम करणार नाही. जर तुम्ही या अॅपचा वापर करत असाल तर फ्रिक्वेन्सी सेटिंग करुन ठेवा आणि नंतर या अॅपचा वापर करा.
 
उंदीर पळवून लावण्यासाठी हा अॅप परिणामकारक दावा करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

RSSची तीन दिवसात सेना तयार करण्याची तयारी