Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे गाढवांना घातले जातात पायजमे

येथे गाढवांना घातले जातात पायजमे
एक नूर आदमी दस नूर कपडा ही म्हण आपल्याला चांगलीच माहिती आहे. म्हणजे पृथ्वीतलावर असा एकच प्राणी आहे ज्याला वेगवेगळ्या तर्हेमचे कपडे आवडतात. हा प्राणी म्हणजे माणूस. आजकाल पाळीव कुत्री, मांजरे यांनाही कपडे घालायची फॅशन आली आहे. मात्र गाढवाला कुणी कपडे घालत असेल अशी कल्पनाही आपण करू शकत नाही. पण आहे, असाही एक भाग आहे जेथे गाढवांना पायजमे घातले जातात व आजही ही पद्धत सुरू आहे.
 
फ्रान्समधील रे बेटाला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात व त्यात चांगली तगडी व पायजमे घातलेली गाढवे हे मुख्य आकर्षण असते. गाढवांना पायजमे घालायची ही प्रथा खूप जुनी आहे. असे सांगतात या भागात मीठाच्या खाणी आहेत. हा भाग थोडा दलदलीचा आहे. मीठ काढण्याच्या कामी पूर्वीपासूनच गाढवांचा वापर केला जात होता. मात्र दलदल व हवेतील उकाडा यामुळे येथे डासांचे प्रमाण खूप होते. हे डास गाढवांना चावत व त्यामुळे त्यांचे चालताना संतुलन बिघडत असे. यावर उपाय म्हणून त्यांना पायजमे घालण्याचा प्रयोग केला गेला व तो कमालीची यशस्वी ठरला.
 
आता या भागात खाणी नाहीत तरीही गाढवांना पायजमे घालण्याची पद्धत सुरू आहे. आता या गाढवांचा उपयोग राईडसाठी केला जातो. म्हणजे बच्चे लोक गाढवाच्या पाठीवर बसून राईड घेतात. या जातीची गाढवे आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून जगात अशी फक्त ३०० गाढवे आहेत व त्यातील १९ फ्रान्समध्ये आहेत असेही समजते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अबब…! महिलेच्या पोटात सापडले चक्क लाटण