Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्पा मोरया....

बाप्पा मोरया....
, बुधवार, 12 सप्टेंबर 2018 (14:08 IST)
मी वयाने कितीही मोठा झालो तरी मी, बाप्पाच म्हणतो. हसतील बरेच जण, पण मी लहनांसारखा बाप्पाच म्हणेन. कारण मला मी अजून मोठा झालोय असं वाटतच नाही, ह्या गणपतीच्या सणाला. एक गुपित सांगतो आज, माझं पाळण्यातले नाव मोरेश्वर आहे. 
 
माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात, गणेशोत्सवापासूनच झाली. आमच्या सोसायटी मध्ये पाच दिवसांचा गणपती असतो, स्टेज बांधलं जातं, त्या स्टेज वर मी आवर्जून भाग घ्यायचो लहानपणी, अनेक स्वगतं तिथे सादर केली, काही गंभीर आणि जास्त विनोदी. तिथेच मला खरा प्रेक्षक वर्ग मिळाला, आत्मविश्वास वाढला आणि ह्या क्षेत्रात येण्याचे निश्चित केले. नाटकाच्या निमित्ताने गणपती दिवसातले अनेक दौरे, अनेक ठिकाणी केले, जास्त करून गोवा. गणपतीचा दौरा असला म्हणजे खूप छान वाटायचं. अनेक ठिकाणाच्या बाप्पाचं दर्शन व्हायचं. प्रसाद खायला मिळायचा. विघ्नहर्ता असल्यामुळे मी त्याच्याकडे सगळ्यांची दुःख दूर होवोत अशी प्रार्थना नेहमी करतो. माझ्या फडके घराण्याचा गणपती पूर्वी पेण ला असायचा. सगळी भावंडं जमायची आणि धमाल करायची. एकत्र गप्पा, गाणी आणि होम मेड आईस्क्रीम, वा वा. पण ते दिन गेले लवकर. सगळ्यात वाईट गोष्ट ही की, घराण्याचा बाप्पा ( घरातल्या मोठ्या आणि समंजस मोठ्या माणसांमुळे) विभागला जाणं, त्यासाठी मी बाप्पावर अजून रुसलो आहे.
आता मी काकांकडे ( कल्याणच्या ) बाप्पा च्या दर्शनाला जातो. 
इतरांना त्रास होईल असं बाप्पाचा सण साजरा करू नये, एवढंच सांगेन.. 
गजानना श्री गणराया आधी वंदू तुझं मोरया... 
शेखर विजय फडके .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाळांमध्ये मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ लघुपट दाखवा