Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभ्यास करुन बेरोजगारीवर बोलावे

अभ्यास करुन बेरोजगारीवर बोलावे
राहूल गांधीचे जर्मनीतील वक्तव्य ऐकले आणि थोड लिहावस वाटल. खर तर भारतात केरळला महापूरामुळे भीषण परीस्थीती ओढवलीय आहे आणि राहूल गांधी भारतातील बेरोजगार तरुणांची बदऩामी भारताबाहेर करत आहेत. कुठल्या वेळेला काय कराव हे साध राहूल साहेबांना का समजू नये. आज राहूल गांधी एका जबाबदार पक्षाचे अध्यक्ष आहेत. खरेतर हा लेख राहूल गांधींना उत्तर देण्यासाठी तर मुळीच नाही किंवा लेखातून कॉंग्रेसवर टिका करण्याचा मुळीच हेतू नाही. बेरोजगारी का वाढतेय अन तीला आपण कस तोंड दिल पाहीजे?
 
ए.पी.जे. अब्दूल कलाम म्हटले कि बेरोजगारी ही कौशल्याच्या अभावामुळे निर्माण झालीय. सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करणे असही ते म्हणत. हे कलामांनी सांगितलेल अगदी खर आहे.कौशल्य कस वाढेल या कडे तरुणांनी लक्ष दिल पाहीजे. बेरोजगारी असण्याची तशी बरीच कारण देता येतील. भारतातील शिक्षण पद्धती ही मुळात बोगस आहे. रोजगार मिळेल ह्या हेतूने नाही तर शिक्षण सम्राटांना पैसा कसा मिळेल हेच बघीतल जात. बेरोजगारीकडे जेवढे दुर्लक्ष तेवढी बेरोजगारी वाढीचे प्रमाण जास्त असेल यात शंका घेण्याचे कारण मुळीच नाही. आपण लहाऩ पणापासून फक्त मार्कस कसे मिळतील याकडेच धावलो. पण कुणी विचार केलाच नाही ह्या शिक्षणाचा नक्की फायदा आहे का पुढे? संगणक क्षेत्रात कितेक तरुण फक्त उच्च शिक्षित असूनही नौकरी मिळत नाही याचे कारण फक्त आपली शिक्षण पद्धती आहे. संगणकाचा जो आज अभ्यासक्रम शिकवला जातो मुळात तो अभ्यासक्रम काही कामाचा नाही कारण दर दिवसाला नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. मग हे सार बेसीक होऊन जात अन खरतर ही संगणकातील बाराखडी आपण शिकत आहोत. मुळ कुठल तंत्रज्ञान आज चालू आहे त्याचा कुणी अभ्यासही नाही करत? शेवटी हातात बेरोजगारी येते. हे सार एकाच्या बाबतीत नाही तर सर्व क्षेत्रात हीच समस्या आहे. कुशल कुणी होतच नाही किंवा कुशल होण्यासाठी शैक्षणीक संस्था काहीच उपाय योजना करत नाही फक्त सारी पोपटपंची चालू आहे.
 
कॉंग्रेसच्या काळात कॉंग्रेसने या कडे लक्ष दिल नाही आणि बेरोजगारी कमी कशी होईल यावर कुणी अभ्यास केलाच नाही. फक्त तरुण वर्ग शिकू नये तो फक्त आपलाच झेंडा घेवून फिरला पाहीजे अशी मानसिकता होवून गेल्यावर कोण लक्ष देणार ? एकाच्याच माथी सार हाणायची सवयच होवून गेलीय. बेरोजगारी काही वर्षांपासून नाही तर या आधी ही कित्यक वर्षांपासून कधी लक्षच दिल नाही त्याचा हा सारा परिणाम आहे. कॉंग्रेसने आपल पोट भरतय ना मग कशाला कुणाकडे लक्ष द्याव हेच घडत आलय.
 
सार्या बाबींवर फक्त राजकारणीच कारणीभूत आहे अस नाही तर स्वत बेरोजगार तरुण ही तेवढाच कारणी भूत आहे ह्या सार्या परिस्थीतीला त्याच्या परिस्थितीला तोही जबाबदारच. आज काबील बनो सक्सेस अपने आप दोडकर आयेगा. हे कुणी लक्षात घेतल का? राहूल जी त्यांच्या भाषणात म्हणतात नोटाबंदी मुळे सर्वात जास्त बेरोजगारी आलीय. मग या आधी का तरुणाला लगेच नौकरी मिळत होती का? राहूल साहेबांनी उत्तर द्याव. बेरोजगार तरुण नक्षली होणार नाही याचा या आधीच्या आपल्या सरकार काय उपाय योजना केली होती. जो तरुण आज नक्षल होत आहे. ? राहूल गांधी नक्षल्यांच टार्गेटच बेरोजगार तरुणच नाही तर ज्याच्याजवळ पैसानाही गरीब आहे हाच व्यक्ती असतो. त्यालाच ते आमिष देवून त्यालाही कळत नाही तो नक्षली कधी झाला ते.
 
बेरोजगारी अजून एक कारण सांगता येईल ते म्हणजे पाहीजे तशी नौकरी मिळण्याच आट्टाहास. त्यापाई तरुण वर्ग कित्येक वर्ष खर्च करतो. आणि शेवटी काहीच हाती लागत नाही. अन बेरोजगारीच प्रमाण वाढत. mpsc,upsc देण वाईट नाही. पण त्यावरच वर्षं वर्ष अवलंबून राहन कितपत योग्य आहे?

तरुण वर्ग स्वतच्या व्यवसायाकडे कधी वळेल,शेती करायची लाज तरुण वर्गाला वाटायच काहीच कारण नाही. शिक्षण पद्धती कधी बदलेल.?
याआधी ह्या इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीचा आपणास कितपत फायदा झालाय? हेही बघणे गरजेचे आहे.
प्राचीनकाळ ची गुरुकुल पद्धत किती योग्य होती हेही बघण गरजेच आहे. 
ह्यासार्या बाबींची पडताळणी करुण समीती बसवली गेली पाहीजे. योग्य ते शिक्षण दिल गेल पाहीजे. गुरुकुल पद्धत म्हणजे कोण कशात पारांगत आहे बघून त्याला आवश्यक तेवढच शिक्षण दिल गेल पाहीजे.कुठल्या क्षेत्रात किती रोजगार आहे हे बघूनच तेवढ्याना शिक्षण दिल पाहीजे. सर्वच कसे कामाला लागतील हे ठरवल पाहीजे. शेती किती लोकांनी करावी, शेती विशयक शिक्षण किती लोकांना द्याव, प्राथमिक शिक्षण सर्वांना कस मिळेल याच बरोबर व्यावसायीक शिक्षण कस जास्त तरुणांना देता येईल हे बघण गरजेच आहे.
 
आई वङील आज काल आईची वेगळी अपेक्षा तर वडीलांची वेगळी अपेक्षा असते, पाल्य तर त्याला तर भलत्याच गोष्टीत तो मग्न असतो मग अशाने कशी प्रगती होणार.पाल्य कशात हुशार आहे हे पालकांनी जाणून घेतल पाहीजे. तेच भविष्यात त्याकडून केल पाहीजे. आपल्या अपेक्षांचे ओझे पाल्याला का?
 
मी बरीच बेरोजगारीच कारण सांगितली आहेत. अजून ही काही कारण असु शकतील. राहूल गांधींना खर खुपच अभ्यासाची गरज आहे. फक्त मोदी टार्गेट न करता अभ्यास करुन बोलावे. बेरोजगारी त्यांनी स्वत कारण शोधावीत अन ती कशी सोडवू याकडे सरकारच लक्ष वेधल पाहीजे. सरकार चांगल काम करत असेल तर त्या प्रोत्साहन दिल पाहीजे. चुकत असेल ठऩकावून सांगीतल पाहीजे. पण आपण ठऩकावून सांगत असताना त्याचा पूर्ण अभ्यास असला पाहीजे. नाही तर आपल हसू होतच हे सार्यांना माहीत आहेच. आपण अभ्यास करुन बेरोजगारीवर बोलाल अपेक्षा करतो. धन्यवाद 
- विरेंद्र सोनवणे 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भिकार्‍यांची केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत