Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओझ्याखाली घूसमटणार्‍या लहानग्यांचे भावविश्व उलगणारा...६ गुण

ओझ्याखाली घूसमटणार्‍या लहानग्यांचे भावविश्व उलगणारा...६ गुण
शाळा....परीक्षा....निकाल...अपेक्षा आणि गुण...“आयुष्यात मला अमुक व्हायच होत...” हे अपूर्ण राहिलेलं स्वप्नं पाल्यावर लादणाऱ्या पालकांचं प्रतिनिधित्व करणारी सरस्वती सरवदे (अमृता सुभाष)....पालकांच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली घुसमटणारा विद्या सरवदे (अर्चित देवधर) यांच्या माध्यमातून आजच्या मुलं आणि पालकांचं भावविश्व उलगडणारी कथा म्हणजे ‘६ गुण’.
 
आपण जे काही गमावलंय, जे काही आपल्या हातून व्हायच राहून गेलंय, आपण जे बनण्याचं स्वप्न पाहिलं ते सार काही आपली मुल पूर्ण करतील किंबहुना त्यांनी ते करायलाच हव असा अट्टाहास असलेले अनेक पालक आपल्या अवतीभवती दिसतात. आपल मुल जगाच्या कुठल्याही स्पर्धेत मागे राहू नये यासाठी वाट्टेल ते करण्याची पालकांची तयारी असते. मात्र हे करताना आपल्या पाल्याच्या इच्छा, त्याची क्षमता आणि त्याच्या मर्यादा याकडे पालक सहज दुर्लक्ष करतात. शाळेत मुलांना किती समजतंय याहूनही अधिक महत्व दिल जात ते त्यांना किती गुण मिळालेत ह्याला...या स्पर्धेत सतत जिंकण्याच्या इर्षेने आपणच मुलांना निराशेच्या वाटेवर ढकलत जातो. आपल्या मुलाच बालपण, त्याच्या व्यक्तिमत्वातील इतर पैलू आपण नकळत गमावतो...पण या स्पर्धेत आपल मुलच गमावलं तर..? हे भीषण वास्तव मांडणारा ६ गुण
 
वर्गात नेहमी पहिल्या येणाऱ्या विद्याला एका वर्षी सहामाही परीक्षेत सहा गुण कमी मिळतात आणि तो वर्गात दुसरा येतो. यामुळे सरस्वती संतापते...केवळ एक गुण कमी मिळाल्याने आपली मेडिकलची सीट कशी गेली हे ती पुन्हा पुन्हा विद्याला सांगते. ६ गुण म्हणजे एक टक्का आणि आपल्या मुलाला एक टक्का कमी मिळाल्याने ति हताश होते. आपले आई – वडील (सुनील बर्वे) आपल्या साठी इतक करतात...आणि आपण ,मात्र त्यांची एक लहानशी अपेक्षा देखील पूर्ण करू शकत नाही यामुळे संवेदनशील विद्या खचत जातो...आईच्या अपेक्षांचं ओझ आणि निराशेच दडपण यातून तो एक पाउल उचलतो... विद्या नेमका काय निर्णय घेतो...? सरस्वतीला तिची चूक समजते का...? सायंटिस्ट असलेले वडील (सुनील बर्वे) या सार्‍यात काय भूमिका घेतात...? हे सर्व बघण्यासारखं आहेच पण अतिशय संवेदनशील विषय आणि मुख्य धारातील तिन्ही कलाकारांची चांगली कामगिरी असली तरी इतर विषयांवर सिनेमा कुणेतरी झोल खातो. 
 
काही दृश्य अप्रतिम निर्मित झाले असले तरी कथा कथा नीटसपणे मांडता आलेली नाही हे जाणवत राहतं. एकूण पालकांच्या अपेक्षेप्रमाणेच या चित्रपटाकडून प्रेक्षकांना असलेल्या अपेक्षेत काही गुण कमीच पडले म्हणावे लागले.
 
 
- प्रियंका देसाई

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशक्य जोक: कहर