Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपट परीक्षण: चि. व चि. सौ. कां.

चित्रपट परीक्षण: चि. व चि. सौ. कां.
अपोझिट अट्रेक्ट्स हे तर आपण ऐकले आहे पण हे जवळ येतात तेव्हा काय होतं, प्रेम होतं की ब्लास्ट? याचे अगदी आगळ्या वेगळ्याप्रकारे चित्रीकरण केले आहे परेश मोकाशीने. दोन भिन्न स्वभावाचे लोकं पण काही तरी नवीन एक्सपीरेमेंट करून पाहण्याच्या आवडीमुळे त्यांनी घातलेला घाट, आणि त्यामुळे उत्पन्न होणारे हास्य लोकांना क्षणभरही कंटाळू देत नाही.
चित्रपटात मोकळेपणाने हसण्याची संधी मिळाली आहे. प्राणीप्रेमी आणि पाणीप्रेमी कसे एकमेकाशी जुळवू पाहतात यावर हा‍ चि‍त्रपट आधारित आहे. प्राणीप्रेमी अक्षरक्ष: रिक्षावाला व्हेज आहे की नाही ही खात्री पटल्यावरच रिक्षेत बसते आणि पाणीप्रेमी लोकांचे उष्टं पाणी स्वत:च्या बाटलीत भरून सेव्ह वॉटरचा संदेश देतो. आपल्या व्यवसायाप्रती त्यांचे वेड लागवणारे प्रेम आणि या शर्यतीवर संसार थाटायला निघालेले नायक आणि नायिका सहजच मन जिंकून घेतात.
 
मधुगंधाच्या लेखणीत नावीन्य असून अनेक सामाजिक विषयांवर कटाक्ष आणि जागरूक करण्याचा तिचा प्रयत्ना यशस्वी ठरला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप, वृद्धावस्थेत आलेला एकटेपणा, तरुण होत असलेला मुलगा, वाढत असलेले घटस्फोट, संसाधनांचा होत असलेला गैरवापर आणि इतर सामाजिक विषय दर्शवण्यात आले आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांनी ठोक बजावून आपल्या भूमिका साकारल्या आणि आमच्या-तुमच्या कुटुंबातील असलेल्या व्यक्तिरेखा अशाच असतात हे चित्रपट बघताना जाणवतं. 
 
झी स्टुडिओचा हा चित्रपट दर्जेदार व सुखावणारा आहे. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले या दोघांचा अभिनय कसलेला आहे तर ज्योती सुभाष वेगळ्याच रंगात आहे. प्रदीप जोशी, सुप्रिया पठारे, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, पूर्णिमा भावे सगळे मन जिंकतात. चित्रपट बघताना हे सर्व आपल्या घरात घडत असल्याचा भास होणे हेच या सिनेमाचे यश आहे.
 
स्वानंद किरकिरे यांची विनावाद्यांचे गाणं, भारत गणेशपुरेची लुडबुड, कसलेले असूनही सामान्य संवाद मनोरंजन करण्यात कुठेही चुकत नाही. चित्रपटात अखरणारी केवळ एकच गोष्ट ती म्हणजे काही सींसमध्ये कॅरेक्टर्सचे अती लाउड होणे.
 
एकूण याला पूर्णपणे लव्ह स्टोरी न म्हणता दोन कुटुंबातील धमाल प्रस्तुती आहे. मनोरंजनाची गारंटी असलेला हा सिनेमा बघायला मुळीच हरकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsApp Joke: पुरूष म्हणजे बटाटे