Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोजागिरी पौर्णिमा 2023 खंडग्रास चंद्रग्रहण

lunar eclipse 2023
, शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (17:24 IST)
Sharad Purnima Chandragrahan 2023 या वर्षी 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण असून रात्री 01.05 ते 02.23 असा ग्रहणाचा पर्वकाल आहे. त्यापूर्वी वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीच्या वेळीलक्ष्मी व इंद्राचे पूजन करुन दूध-साखरेचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवता येईल. मात्र प्रसाद म्हणून तीर्थरुपी दूध प्राशन करावे आणि दुसर्या दिवशी प्रसाद ग्रहण करावे.
 
28 ऑक्टोबरच्या रात्री वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण भारताच्या अनेक भागात दिसणार आहे. या दिवशी शरद पौर्णिमा असेल. हे चंद्रग्रहण पहाटे 1.05 वाजता सुरू होऊन पहाटे 02.23 वाजता संपेल. अशा प्रकारे हे ग्रहण सुमारे 1 तास 19 मिनिटे चालेल. हे चंद्रग्रहण भारतात तसेच युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण आफ्रिका, आर्क्टिक, अंटार्क्टिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरासह आशियातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे.
 
खंडग्रास चंद्रग्रहण वेळ
स्पर्श रात्री 1.05
मध्य रात्री 1.44
मोक्ष 2.23
पर्वकाल 1 तास 18 मिनिटे
 
वेधारंभ - दुपारी 3 वाजून 10 मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जप, श्राद्ध कर्मे करता येतील.
 
वेधकाळात भोजन निषिद्ध आहे म्हणून अन्न ग्रहण करु नये.
वेधकाळात इतर आवश्यक कार्ये जसे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप ही कर्मे करता येतात.
बाल, आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी रात्री 7 वाजून 40‍ मिनिटांपासून ग्रहणाचे वेध पाळावेत.
ग्रहण पर्वकाळात म्हणजे रात्री 1.05 ते पहाटे 2.13 मात्र पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोपणे ही कामे देखील करु नयेत.
 
ग्रहणात काय करावे - ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे.
 
ग्रहणाचे राशींवर प्रभाव -
शुभफल : मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ
मिश्रफल : सिंह, तूळ, धनू, मीन
अशुभ फल : मेष, वृषभ, कन्या आणि मकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ank Jyotish 23 सप्टेंबर 2023 दैनिक अंक राशीफल,अंक भविष्य 23 September 2023 अंक ज्योतिष