Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तांब्याच्या भांड्यात चुकूनही ह्या वस्तू ठेवू नये

तांब्याच्या भांड्यात चुकूनही ह्या वस्तू ठेवू नये
जास्त करून लोकांना तांब्याच्या भांड्यांचे फायदे माहीत असतात. पण काही अशा वस्तू आहे ज्यांना तांब्याच्या भांड्यात ठेवल्याने आरोग्याला नुकसान होते. तांब्यात कॉपर असत आणि काही वस्तूंसोबत मिळून ते रीऍक्ट करू लागत. अशात फूड प्वाइजनिंग होण्याची शक्यता वाढून जाते. येथे आम्ही तुम्हाला अशा काही वस्तूंबद्दल सांगत आहोत ज्यांना तांब्याच्या भांड्यात खाल्ल्याने शरीराला नुकसान पोहचू शकत.
 
1. लोणच – तांब्याच्या भांड्यात लोणच ठेवल्याने यात उपस्थित सिरका मेटलसोबत मिळून जात. यामुळे बॉडीत फूड प्वाइजनिंग होण्याची शक्यता जास्त असते.
 
2. लिंबाचा रस – लिंबाच्या रसात असलेले ऍसिड तांब्यासोबत मिळून रीऍक्ट करत. यामुळे ऍसिडिटी किंवा पोटाचे दुखणे होण्याची शक्यता असते.
 
3. दही – दहीत उपस्थित तत्त्व तांब्यासोबत मिळून रीऍक्ट करतात ज्यामुळे फूड प्वाइजनिंगचा धोका वाढू शकतो.
 
4. आंबट फळ – तांब्याच्या भांड्यात कुठले ही आंबट फळ ठेवल्याने फूड प्वाइजनिंगचा धोका वाढू शकतो. अशात उलटी, चक्कर येणे किंवा जीव घाबरण्या सारखे प्रॉब्लम्स होऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मर्चट नेव्ही- जरा 'हट के' करियर