Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बागेतील चक्कर लावा आणि तणाव कमी करा

बागेतील चक्कर लावा आणि तणाव कमी करा
मानवी मेंदूला तणाव जाणवतो. किंबहुना आजच्या जीवन पद्धतीमध्ये तणाव अपरिहार्य ठरला आहे. परंतु शास्त्रज्ञांना मानवी मेंदूचा हाही गुणधर्म माहीत आहे की, ज्यामुळे तणावग्रस्त मेंदू पुन्हा शांतसुद्धा होऊ शकतो. सततचे आवाज, मानसिक अशांतता आणि दगदग यामुळे माणूस चिडचिडा होऊन जातो आणि त्यामुळे मेंदू शिणतो. या शिणलेल्या मेंदूवर काय इलाज करावा, यावर शास्त्रज्ञांचे अनेक प्रयोग चालू आहेत आणि साहजिकच मन:शांती देणार्‍या गोळ्या बाजारात येत आहेत. गोळ्या घेतल्याने मन:शांती मिळू शकेलही. परंतु ती तात्पुरती असेल. कारण 
 
मेंदूवरचा तणाव वाढला की, शरीरामध्ये काही विशिष्ट द्रव्ये पाझरायला लागतात आणि औषधाने या द्रव्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे तणाव कमी होत नाही, आहे तिथेच राहतो. तणावाला कारणीभूत ठरणारी मन:स्थितीही तशीच राहते. तणावाच्या परिणामावर औषध दिले जाते. या गोळ्यांचा प्रभाव संपला आणि पाझरलेली द्रव्ये कमी झाली की, पुन्हा तणाव उङ्खाळून वर येतो. म्हणजे हा तात्पुरता उपाय आहे आणि ती परिस्थिती कायम राहावी यासाठी एकामागे एक गोळ्या घेत राहावे लागते. यावर कायमचा खरा इलाज करायचा असेल तर तणावाच्या मुळाशी म्हणजे मन:स्थितीजवळ जावे लागेल आणि ती बदलावी लागेल. मन:स्थिती बदलणे म्हणजे मुळावर घाव घालणे आणि तसे झाले की, चिडचिडेपणावर कायमचा इलाज होतो. तसा इलाज म्हणजे दाट झाडी असलेल्या भागातून पायी ङ्खिरणे. विशेषत: अशा झाडांच्या खाली भरपूर पालापाचोळा पडला असेल तर त्यावरून जरूर चालावे. 
 
सडकेवरून पायात शूज घालून फेरफटका मारला तर शरीर आणि चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात हे खरे, परंतु उघडय़ा पायांनी झाडाखाली पडलेल्या पालापाचोळ्यावरून चालण्याने त्यापेक्षा अधिक प्रमाणात तणाव कमी होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेक्सचा वांदा, दूर करणार कांदा