Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Health Tips : भेंडी करेल वजन कमी

Health Tips : भेंडी करेल वजन कमी
बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते. वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी फायदेशीर ठरेल. पाहू किती गुणकारी आहे भेंडी:
 
* वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.
 
मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.


 
भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.
 
भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केसगळतीवर फायदेशीर जास्वंद