Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यामुळे नक्कीच खळखळून ‘हसाल’

यामुळे नक्कीच खळखळून ‘हसाल’
धावपळीच्या जीवनशैलीमुळे हसणे हरवत चालले आहे. कामातून वेळ काढून हास्यविनोद करुन खळखळून हसण्यासाठी कोणालाच वेळ मिळत नाही. निरोगी आरोग्यासाठी फक्त शारीरिक व्यायामच नव्हे तर मानसिक आरोग्यही चांगले असणे आवश्यक असते. हसण्याचे अनेक फायदे आहेत, ते पुढीलप्रमाणे..
 
मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शारीरिक व्यायामाऐवजी मोठय़ाने हसणे खूप आवश्यक आहे. तसेच नेहमी आनंदी राहिल्याने शारीरिक ऊर्जा वाढते. यामुळे तुम्ही चांगले आणि अधिक काम करू शकता. 
 
हसल्यामुळे स्टड्ढेस हार्मोन्स कार्टिसोल नियंत्रणात असतो. परिस्थिती कितीही तणावपूर्ण असू द्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हामरेन्सची सक्रियता वाढते. 
 
हसल्याने शरीरात एंडोर्फिस हा गुड फिल करणारा घटक क्रियाशील होतो. यामुळे शरीरातील विविध भागात होणारे दुखणे कमी होते. हा रासायनिक घटक पेन किलरप्रमाणे काम करत असतो. 
 
रक्तप्रवाह सुरळीत करण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहर्‍यावरील टवटवीतपणा कायम राहतो. एका संशोधनानुसार मधुमेहाने पीडित लोकांनी जेवण केल्यानंतर हसल्यास किंवा कॉमेडी शो पाहिल्यास ब्लड शुगर बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात राहते. 
 
चिंतामुक्त राहिल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे विविध संसर्ग होण्यापासून तुम्ही दूर राहता. हसणे हृदयासाठी खूप चांगले आहे..
 
10 मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयाची गती वाढते तेवढीच फक्त एक मिनिट हसल्यानेही वाढते, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आंब्याचे लोणचे : केरळी पद्धतीने