Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साखरेमुळे पाच नुकसान

साखरेमुळे पाच नुकसान
साखर आमच्या जीवनातील अविभाज्य अंग आहे. आणि याचा गोडवा जितका हवा हवासा वाटतो तेवढेच याचे नुकसानही आहेत. जर आपल्यालाही साखर खाण्याची सवय असेल तर यापासून होणारे पाच नुकसान जाणून घ्या:


मधुमेह- आपल्या परिवारात कोणालाही डायबिटीज असल्यास आपण साखर कमी करावी. कारण की अनुवांशिक रूपात याचे सेवन मधुमेहाचे कारण बनू शकतं.
 
खाज- साखरेची अतिरिक्त मात्रा सेवन केल्याने गुप्तांगामध्ये खाज सुटण्याची तक्रार होते. याने गुप्तांगाहून अत्यधिक तरल स्त्राव आणि संक्रमण होण्याची शक्यताही असते.

हृदय रोग- अधिक साखरेमुळे हृदय नलिकेत चरबी जमा होऊन ती ब्लॉक होण्याची शक्यता असते. याने हार्ट अटॅकची शक्यता वाढते.

webdunia

 
इसब- त्वचेवर अधिक साखर सेवन केल्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. एका संशोधनाप्रमाणे साखरेमुळे इसब होण्याची शक्यता वाढते.
 
कमजोर हाडं- साखरेमुळे हाडं कमजोर होतात आणि ऑस्टिओपोरोसिस रोग होण्याची शक्यता असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मीच मला सांगतो