Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डास, माशा दूर होतात बहुउपयोगी विक्स वेपोरबने

डास, माशा दूर होतात बहुउपयोगी विक्स वेपोरबने
डोकेदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास आपण विक्स वेपोरबचा वापर करतो. मात्र विक्स वेपोरबचा केवळ सर्दी, खोकल्यासाठीच वापर होत नाही तर याचे अनेक फायदेही आहेत, जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील.
* आपले कपडे व त्वचेवर विक्स वेपोरब लावल्यास डास दूर होतील. 
* विक्स वेपोरबच्या वापराने सायनसमुळे होणारी डोकेदुखी बरी होण्यास मदत होते. 
* ऐकायला कदाचित हे विचित्र वाटेल, मात्र विक्स वेपोरब पिंपल्सवर लावल्यास पिंपल्स बरे होतात. 

* अनेकदा नाटक, सीरियल्सच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांना खोटे अश्रू काढावे लागतात, तर थोडासा वेपोरब डोळ्यांच्या खाली लावा. 
* कीटक, पतंगांनाही दूर राखण्याचे काम विक्स वेपोरब करते. 
* खाण्याच्या टेबलावरून माशा दूर करायच्या असल्यास टेबलावर विक्स वेपोरबची डबी उघडून ठेवावी. 
webdunia

* खरचटल्यास विक्स वेपोरबमध्ये थोडेसे मीठ मिसळून खरचटलेल्या जागी लावा. जखम लवकर बरी होईल. 
* स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठीही विक्स वेपोरबचा वापर होतो. नियमितपणे स्ट्रेच मार्कवर विक्स वेपोरब लावल्यास दोन आठवड्यांत तुम्हाला परिणाम दिसू लागतील. 
* ड्राय स्किनसाठी विक्स वेपोरब एक मॉश्चमरायझर म्हणून काम करते.
webdunia

* टेनिस एल्बोचा त्रास असल्यास विक्स वेपोरबचा तुम्हाला नक्की फायदा होईल. यातील मेंथॉल आणि कापरामुळे दुखणे बरे होते. 
* तळपायाला भेगा पडल्यास त्यावर विक्स वेपोरब गुणकारी आहे. 
* रात्री झोपताना विक्स वेपोरब लावल्यानंतर पायात सुती मोजे घालून झोपा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यात उगवणाऱ्या ‘या’ वनस्पतीचे औषधी उपयोग माहित आहेत का?