Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पीरियड्समध्ये जास्त ब्‍लीडिंग होतंय, मग हे घरगुती उपाय करा

पीरियड्समध्ये जास्त ब्‍लीडिंग होतंय, मग हे घरगुती  उपाय करा
, शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (09:46 IST)
जास्तकरून महिलांमध्ये पीरियड्सदरम्यान अत्यधिक ब्‍लीडिंगची समस्या असते, त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताची कमी होते. या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी जर तुम्ही हार्मोनल औषध घेत असाल तर त्याला बंद करून घरगुती औषधांचा वापर करणे सुरू करा नक्कीच फायदा होईल.  

जर तुम्ही या समस्येला इगनोर करणे सुरू केले तर, तुम्ही थकवा, ऍनिमिया, मूड स्‍विंग आणि सर्वाइकल कँसरचे शिकार देखील होऊ शकता. अत्यधिक ब्‍लीडिंग होण्याचे बरेच कारणं असू शकतात, जसे : हार्मोनल असंतुलन, फाइब्रॉएड, पेल्‍विकमध्ये सूज, थायराइड इत्यादी. पण तुम्हाला कुठलाही आजार नसेल तरी देखील जास्त ब्‍लीडिंग होत असेल, तर त्याचे मुख्य कारण तुम्ही घेत असेलेले औषध देखील असू शकतात.  

तर तुम्हाला काही घरगुती औषधांचे नावं सांगत आहो आणि त्याचे सेवन केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

साबूत धणे : अर्धा ग्लास पाण्यामध्ये थोडेसे साबूत धणे उकळा. जेव्हा पाणी गार होईल, तेव्हा त्या पाण्याचे सेवन करा. असे केल्याने   तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
webdunia

चिंच : यात फायबर आणि एंटीऑक्‍सीडेंट्स असतात, जे रक्ताला जमवण्यात मदत करतो आणि जास्त ब्‍लीडिंग होण्यापासून बचाव करतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की फार जास्त ब्‍लीडिंग होत आहे, तर एक चिंचेचा तुकडा नक्की खा.
webdunia
सिट्रस फळं :  व्हिटॅमिन सी, जास्त ब्‍लीडिंग होण्यापासून रोखतो. मासिक पाळीच्या वेळेस जर तुम्ही संत्र्याचा ज्यूस दिवसातून दोन वेळा प्यायले तर नक्कीच फायदा होईल.  

ब्रॉक्‍ली : हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन असतं, जे रक्त जमण्यास मदत करतो. म्हणून जेव्हा जास्त ब्‍लीडिंग होत असेल तेव्हा आपल्या आहारात हिरव्या भाज्यांना प्राधान्य द्या.  

मुळा : मुळा रक्त जमवण्यास मदत करतो. मुळी शिजवताना, यात मुळ्याचे पान देखील टाकावे. या भाजीला पीरियड्सच्या वेळेस जरूर सेवन केले पाहिजे ज्याने ब्लड फ्लो कंट्रोलमध्ये राहील.
webdunia
पपीता : तसं तर पपीता पीरियड्स होण्यास मदत करतो. पण कच्च्या पपितेचे सेवन पीरियड्सच्या दिवसांमध्ये केल्याने जास्त ब्‍लड फ्लो होत नाही. या दिवसांमध्ये तुम्ही कच्च्या पपितेचे दोन पीस खाऊ शकता. 

आवळा : आवळा किंवा आवळ्याचा ज्यूस, भारी ब्‍लीडिंगला रोखतो. या ज्यूसला दिवसातून दोन वेळा प्या आणि या समस्येपासून सुटकारा मिळवा. ज्यूस प्यायला नंतर थोडेसे मिठाचे सेवन जरूर करा, ज्याने तुमचा गळा खराब होणार नाही.  

दालचिनी (कलमी) : दालचिनीचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून ते पाणी प्यायला पाहिजे.
webdunia
कारली : कारल्याच्या भाजीचे सेवन केल्याने देखील फायदा होतो. ही भाजी हेवी ब्‍लीडिंगला कंट्रोल करू शकते.  

एलोवेरा : एलोवेराचा ज्यूस दिवसातून दोन वेळा प्यायला पाहिजे. याने देखील समस्या दूर होईल.  

कशी आहे तुमची डायट  
तुमच्या डायटमध्ये जास्तकरून व्हिटॅमिन आणि मिनरल्स जसे, मॅग्‍नीशियम, आयरन आणि कॅल्शियम असायला पाहिजे. डायटमध्ये प्रचुर मात्रेत फळ आणि हिरव्या भाज्यांना सामील करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे प्रेम नव्हे... आजार आहे