Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थकवा आणि कमजोरी घालवण्यासाठी नंबर 1 आहे हे ड्रिंक

थकवा आणि कमजोरी घालवण्यासाठी नंबर 1 आहे हे ड्रिंक
, सोमवार, 14 जानेवारी 2019 (15:25 IST)
आमचा 60-70 टक्के शरीर पाण्याने बनले आहे. जेव्हा आमच्या शरीरात पाण्याची मात्रा कमी होते तर आम्हाला बर्‍याच आजारांना तोंड द्यावे लागते. शरीरात पाण्याची कमतरतेमुळे कमजोरी, थकवा व चक्कर सारखे लक्षण दिसून येतात.  
  
अशी समस्येहून निपटण्यासाठी व्यक्तीला सर्वात आधी ओरल हाइड्रेशन साल्ट (ओआरएस)चे सेवन केले पाहिजे. या ओआरएसच्या घोळाला घरीच बनवू शकतो व थकवा व कमजोरीपासून लगेचच सुटकारा मिळवू शकतो. तसं तर ओआरएस कुठल्याही मेडिकल स्टोअरवर उपलब्ध असत, पण आपत्कालीन स्थितीत जर नाही मिळाले तर घाबरण्याची गरज नाही कारण तुम्ही याला घरीच तयार करू शकता.  
 
याला तयार करण्यासाठी तुम्हाला एक जग पाणी, 5 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ हवे आहे. एक जगामध्ये स्वच्छ पाणी भरा.  आता यात 5 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करा. साखर व मिठाला चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. याला तयार करताना साखर व मीठ दिलेल्या प्रमाणातच टाकावे.  
 
दिलेल्या सामग्री शिवाय घोळात अजून काहीही टाकू नये. कुठल्याही प्रकारच्या रंगाचा किंवा कृत्रिम स्वीटनरचा वापर करू नये. सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर या घोळला ग्लासमध्ये घालून प्यायला पाहिजे. तुम्ही याला पूर्ण दिवसभर थोडे थोडे करून त्याचे सेवन करू शकता.   
 
तुम्ही याला फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता. तयार केलेल्या घोळाला तुम्हाला 24 तासात संपवणे गरजेचे आहे. आणि दुसर्‍या दिवशी परत नवीन घोळ तयार करावा.  
 
हा सर्वात सोपा व प्राकृतिक हाइड्रेटिंग एजेंट आहे ज्याला तुम्ही घराच्या घरीच तयार करू शकता, हा घोळ तुम्हाला 5 मिनिटात थकवा आणि कमजोरीपासून मुक्ती देतो.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संक्रांत विशेष : भोगीची भाजी