Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असे घालवा फळं आणि भाज्यांवरील कीटकनाशक

असे घालवा फळं आणि भाज्यांवरील कीटकनाशक
फळं आणि भाज्यांवर हानिकारक घटकांचा एक थर असतो. थर कीटकनाशक, धूळ आणि जिवाणूंचा असू शकतो. नुसतं एकदा पाण्याने धुतल्याने हे स्वच्छ होत नाही कारण पाणी फक्त 20 टक्के कीटकनाशक साफ करू शकतं. परिणामस्वरूप पोटाचे विकार व इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तसेच ऑरगॅनिक फूड असले तरी पिकवताना कीटनाशक वापरलेली असू शकतात. तर जाणून घ्या कसे स्वच्छ कराल फळं आणि भाज्या.
 
* फळं आणि भाज्यां एका कंटेनरमध्ये पुरेश्या पाण्यात एकत्र करून घ्या. यात एक मोठा चमचा व्हिनेगर मिसळा. 15 मिनिट तसेच राहू द्या. नंतर फळं- भाज्या काढून चांगल्या पाणी धुऊन घ्या. किंवा एका स्प्रे बॉटलमध्ये तीन भाग पाणी आणि एक भाग व्हिनेगर मिसळून वापरा. व्हिनेगर 98 टक्के कीटनाशक घालवण्यात मदत करतं.
 
* या व्यतिरिक्त पाण्यात बेकिंग सोडा मिसळून फळं आणि भाज्या 15 मिनिटासाठी असेच राहू द्या. बेकिंग सोड्याने 100 टक्के हानिकारक घटक साफ होतात असे एका शोधात आढळून आले आहे.
 
तसेच भाज्या आणि फळभाज्या शिजवून घेणे सर्वात उत्तम ठरेल आणि फळं सोलून खाणे योग्य ठरेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी कथा : एक्सचेंज ऑफर