Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Peeing After Physical Relation शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लघवी करणे खूप महत्वाचे

relationship tips
Peeing After Physical Relation शारीरिक संबंध बनवणे ही प्रत्येक व्यक्तीची गरज असते, जी त्याला मानसिक समाधान देण्यासोबतच फिट राहण्याचे काम करते. तथापि या काळात लोकांना काही खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येतो. या खबरदारीकडे दुर्लक्ष करणे लोकांसाठी त्रासाचे कारण बनू शकते. सहसा लोकांना संबंधानंतर लघवी करण्याचा सल्ला दिला जातो, ज्याकडे लोक आवश्यक न मानून दुर्लक्ष करतात. लोकांची ही एक चूक त्यांना खूप काळासाठी त्रासदासक ठरु शकते. रोमांटिक मूडमधून लघवी करण्यासाठी अंथरुणातून बाहेर पडण्यात आळस येऊ शकतो परंतु ते तुम्हाला अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकतं. संबंध ठेवल्यानंतर लघवी करणे का आवश्यक आहे? जाणून घ्या- 
 
बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका कमी होतो
लोकांच्या शरीरात आणि त्यांच्या आजूबाजूला अनेक बॅक्टेरिया असतात, जे आरोग्यासाठी फारसे चांगले मानले जात नाहीत. जेव्हा लोक संबंध बनवतात तेव्हा हे बॅक्टेरिया त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर जमा होतात, ज्यामुळे खाज आणि जळजळ होऊ शकते. या दोन्ही समस्यांमुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
 
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनला प्रतिबंध करते
संबंध ठेवल्यानंतर लोकांच्या प्रायव्हेट पार्ट्सभोवती भरपूर बॅक्टेरिया जमा होतात. हे जीवाणू प्रायव्हेट पार्टमध्ये गेल्यास मूत्रमार्गात गंभीर संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच तज्ञ लोकांना यानंतर लघवी करण्याचा सल्ला देतात जेणेकरून ते संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकतील. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की महिलांना संसर्गाचा धोका जास्त असतो, त्यामुळे त्यांनी संबंध ठेवल्यानंतर लगचेच लघवी करणे आवश्यक आहे.
 
जागा स्वच्छ धुवावी
संबंध ठेवल्यानंतर लघवीला जाऊन प्रायव्हेट पार्ट पाण्याने स्वच्छ धुवुन घ्यावे. याने इंफेक्शनचा धोका कमी होतो.
 
लघवीमुळे गर्भधारणा होण्याचा धोका कमी होतो?
बहुतेक स्त्रिया फक्त या विचाराने संबंध ठेवल्यानंतर लघवी करतात की असे केल्याने त्या गर्भवती होण्यापासून वाचू शकतात. मात्र यात तथ्य नाही. लघवीचा गर्भधारणेशी काहीही संबंध नाही. लघवी केल्याने केवळ मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. गर्भधारणा टाळण्यासाठी इतर पर्यायांचा अवलंब केला पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उलटं चालण्याचा शरीर आणि मेंदूला काय फायदा होतो? वाचा