Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ह्या '4'गोष्टी ऑफिसमध्ये तुमचं 'अफेअर' लपवण्यासाठी मदत करतील

ह्या '4'गोष्टी ऑफिसमध्ये तुमचं 'अफेअर' लपवण्यासाठी मदत करतील
तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत सतत वेळ घालवला त्याच्याबरोबर बोलणं, चालणं फिरणं यामुळे दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग निर्माण होतं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तुमच्या आजुबाजूच्या लोकांमध्ये त्याचा अंदाज सहज लागू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या नात्याबद्दल 'गॉसिप' होऊ नये म्हणून थोडी दक्षता घेणं आवश्यक आहे. म्हणूनच या खास टीप्सकडे लक्ष द्या.
 
सतत एकत्र दिसणं टाळा - 
जेव्हा लोकं प्रेमात वेडी होतात तेव्हा त्यांना सतत त्यांच्या साथीदारासोबत राहणं आवडतं. पण तुमच्या नात्याबद्दल ऑफिसमध्ये चर्चा नको असल्यास सतत एकत्र येणं-जाणं बंद करा. कारण तुमच्या देहबोलीवरून अगदी सहज तुमच्या नात्याबद्दल हिंट मिळू शकते.
webdunia
टाळणं शिका -
तुम्ही दोघं वेगवेगळ्या विभागात काम करत असलात तरीही सतत एकामेकांशी बोलणं तुमच्या नात्याची पोलखोल करू शकतात. अशावेळेस एकत्र ऑफिसमध्ये असुनही एकमेकांना टाळायला शिका. एकमेकांना पाहून असं वागायला शिका की तुम्ही फक्त दोस्त आहात.
 
सतत त्याच्याजवळ जाणं टाळा - 
तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी तुमच्याच ऑफिसमध्ये असेल तर सहाजिकच तुम्हांला सतत त्या व्यक्तीच्या जवळ राहणं आवडतं. विनाकारण ऑफिसमध्ये त्या व्यक्तीच्या जवळ घुटमळणे टाळा. यामुळे तुम्हीच नकळत ऑफिस गॉसिपसाठी लोकांना विषय देत रहाल.
webdunia
भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक -  
तुमचा साथीदार ऑफिसमध्ये असो किंवा नसो, तुमच्या भावनांवर तुमचा संयम असणं आवश्यक आहे. जर तुमचा साथीदार ऑफिसमध्ये नसेल आणि तुम्ही उदास राहिल्यास सहाजिकच लोकांच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शांत झोप हवी आहे, मग हे करून बघा