Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पेशल कोल्हापुरी : पांढरा रस्सा

स्पेशल कोल्हापुरी : पांढरा रस्सा
साहित्य : पाव किलो मटण, ४ चमचे गोडेतेल, १ नारळ, १०-१५ काजू, ५ चमचे खसखस, ४ चमचे पांढरे तीळ, ४-५ लाल मिरच्या, ४ लवंगा, १ तुकडा दालचिनी, ५-६ काळेमिरी, ४ हिरवी वेलची, २ मसाला वेलची, तमालपत्र, आले-लसून पेस्ट, हिंग, चवीपुरते मीठ़
 
कृती : प्रथम काजू, तीळ, खसखसची पेस्ट तयार करून बाजूला ठेवा, त- च एका नारळाचे दूध काढून घ्या. मटण साफ धुवून घेणे. एका पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये हिंग, लवंग, दालचिनी, काळेमिरी, हिरवी वेलची, मसाला वेलची, तमालपत्र, लाल मिरची, आले-लसून पेस्ट घाला. नंतर मटण घाला. चांगले परतून घ्या. पातेल्यावर झाकण ठेवून त्यामध्ये पाणी ठेवून मटण शिजवून घ्या. मटण शिजल्यानंतर काजू-तीळ-खसखसची पेस्ट घालून चांगले ढवळून त्यात झाकणातले थोडे गरम पाणी घाला. चवीपुरते मीठ घाला, नारळाचे दूध घालून चांगले गरम करा. परंतु उकळी येऊ देऊ नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi