Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Kavita निरोप शब्द उच्चारता थोडं जड जातं

love poem
, गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (22:47 IST)
निरोप शब्द उच्चारता थोडं जड जातं,
काहीतरी सुटलं हातून, मनी पक्क होतं,
सोडावस वाटत नाही ते, पकडून ते ठेवावं वाटत,
घट्ट मिठीत आपल्या, जखडून राहावंसं वाटत,
जसं कळतं निरोपाची वेळ जवळ आलीय,
इथलं अस्तित्व संपून, निघण्याची घडी झालीय,
सावरासारव करायला हवी पसाऱ्याची ,
सोडवणूक करायला हवी, गुंतलेल्याची,
सोप्पं व्हायला लागतं मग निरोपाच्या क्षणाला,
वाईट वाटतं पण मन सज्ज झालेलं असतं, समजलेलं असतं स्वतःला!!
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इन्स्टंट वॉटर हीटर्स म्हणजे काय? ते कसे काम करतात? हे सामान्य गिझरपेक्षा किती वेगळे आहेत?