Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन
, बुधवार, 28 मार्च 2018 (10:54 IST)
ज्येष्ठ विचारवंत, अस्मितादर्श चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ गंगाधर पानतावणे यांचे दुःखद निधन झाले आहे. एक विचारवंत लेखक, दलीत साहित्याचे अभ्यासक आणि संपादक असलेले गंगाधर विठोबाजी पाणतावणे हे मुळचे विदर्भातले. 28 जून 1937 साली नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. 1956 साली मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते अध्यापन करु लागले.
 
मॅट्रिक झाल्यावरच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली होती. प्रतिष्ठान` नियतकालिकातून त्यांनी सुरुवातीला लेखन केले आणि त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर विपूल लेखन केले. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेच लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. त्यापैकी `धम्मचर्चा` `मूल्यवेध`, मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. अस्तितादर्श` या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिका म्हणून अस्मितादर्श कडे पाहिले जाते.डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत आहेत. दलित साहित्य व दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक आहेत. औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते.डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पायांच्या भेगा सतावताहेत?