Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन

प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन
, सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (09:47 IST)
प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे (७७) यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी  अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलकेलं होतं. 

'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी'  ही वेगळ्या वळणाची दीर्घ कथा लिहून ते प्रकाशात आले. चिपळूणला भरणाऱ्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. 
 
 

प्रकाशित साहित्य - 

- अण्णांची टोपी (कथासंग्रह)
- आजची नायिका (उपरोधिक)
- इतिवृत्त
- इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह)
- उलटा आरसा (उपरोधिक)
- एक माणूस एक दिवस (भाग १ ते ३)
- कलियुग
- काळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक)
-घोडा
- चुनाव रामायण (व्यंगकथा)
- ज्वालामुख (कथासंग्रह)
- टार्गेट
- द बिग बॉस (व्यंगकथा)
- दिनमान (उपरोधिक लेख)
- देवाची घंटा
- न लिहिलेले विषय (वैचारिक)
- निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२)
- न्यूज स्टोरी
- पोहरा (आत्मकथा; ह्णबालकांडह्णचा २रा भाग)
- बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा)
- बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे)
- मधलं पान (लेखसंग्रह)
- मार्केट (१९८६)
- मुंबईचे उंदीर (व्यंगकथा)
- माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा)
- युद्ध
- लावा (हिंदी)
-वीज (बाल साहित्य)
- श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)
- सॉफ्टवेअर
- स्वर्गसुखाचे (विनोदी)
- हद्दपार
- आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मैसूर पाक