Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाळीदरम्यान नका करू या 9 चुका

पाळीदरम्यान नका करू या 9 चुका
मासिक पाळीदरम्यान अश्या अनेक गोष्टी आहे ज्या टाळल्या पाहिजे. या काळात अधिक प्रमाणात रक्त स्राव होत असल्यामुळे महिलांनी स्वत:कडे दुर्लक्ष करायला नको. आता हे वाचून आपण ठरवू शकता की पिरियड्स दरम्यान आपल्याला काय काम करायला हवे आणि काय करणे टाळावे:
 
उदासिन प्रोग्राम बघणे
या दरम्यान महिला अनेक वेगवेगळ्या प्रकाराच्या भावनांशी झुंजत असतात. कधी खुशी, तर कधी राग, कधी चिडचिड तर कधी असुरक्षित अशी भावना येत असते. म्हणून या दरम्यान ताण देणारे, डिप्रेस करणारे प्रोग्राम पाहणे टाळावे.
 
व्यायाम टाळणे
अनेक महिला पिरियड्स दरम्यान व्यायाम करायला टाळतात. परंतू हे योग्य नाही. हलका व्यायाम केल्याने वेदना कमी होतात. काही महिलांना तर जिमिंग करुनही बरं वाटतं.
 
लाइट रंगाचे कपडे
लाइट रंग नेहमी फॅशन मध्ये इन असले तरी पिरियड्स दरम्यान असे कपडे घातल्यावर सतत डोक्यात कुठे डाग तर पडला नाही ना.... हा विचार सुरू असतो... आधीच वेदना त्यातून डाग दिसण्याचा ताण घेण्यापेक्षा या दिवसात लाइट रंगाचे कपडे घालणे टाळावे.
 
दुधाचे पदार्थ
पाळीदरम्यान वेदनांपासून मुक्तीसाठी कॅल्शियमचे सेवन करावे परंतू दूध आणि दुधापासून निर्मित पदार्थ जसे पनीर, दही हे खाणे टाळावे. याने वेदना वाढू शकतात. याऐवजी दूध पिणे किंवा नारळच दुधाने तयार दही खाणे योग्य ठरेल. फळं किंवा स्मूदी पिऊ शकता.
 
पॅड्स न बदलणे
पिरियड्स दरम्यान स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान झेलावे लागेल. अधिक वेळापर्यंत एकच पॅड ठेवल्याने इन्फेक्शन व्हायची भीती असते. म्हणून प्रत्येक तीन ते चार तासात पॅड किंवा टॅम्पोन बदलत राहावे.
 
मीठ खाणे
पाळीदरम्यान अधिक प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने गाठी पडतात. त्यापेक्षा फळ-भाज्या खाणे योग्य ठरेल.
 
अधिक प्रमाणात कॅलरीज
या दरम्यान चॉकलेट, मसालेदार आणि तळकट पदार्थ खाण्याची इच्छा जागृत होते. तरी स्वत:वर नियंत्रण ठेवून हे खाणे टाळावे कारण याने या दरम्यान हे पदार्थ खाल्ल्याने जलद गतीने लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते.
 
वॅक्सिंग
अनेक महिलांना या काळात खूप वेदना सहन कराव्या लागतात म्हणून या दरम्यान वॅक्सिंगचा विचार टाळावा. पाळी येण्याच्या आठवडाभर आधीच वॅक्सिंग करणे योग्य ठरेल.
 
चिडचिड करणे
पाळीदरम्यान मूड स्विंग होत असेल तर आपल्या जवळीक माणसांना याची जाणीव करवून काही काळासाठी एकांत राहण्याची विनंती करावी. यादरम्यान वॉक करणे, व्यायाम करणे, पुस्तक वाचणे, गाणी ऐकणे किंवा आपले कुठले छंद पूर्ण करण्यात आपण वेळ घालवू शकतात. या दरम्यान स्वत:साठी अधिक वेळ काढून आपण येणारे दिवस सुखी करू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीखंड