Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाळी दरम्यान पुरळ? आता नाही....

पाळी दरम्यान पुरळ? आता नाही....
अनेक मुलींना आणि ‍महिलांना पाळी दरम्यान शारीरिक बदलच्या समस्यांना समोरा जावं लागतं. ज्यात मूड बदलणे, पोट दुखी आणि इतर वेदना सामील आहेत. परंतू काही स्त्रियांना या दरम्यान पुरळ येण्याची समस्या उद्भवते. पाळी दरम्यान शरीरात टेस्टोस्टेरोन आणि एस्ट्रोजन हार्मोनचं स्तर वाढतं ज्यामुळे सिबेसियस ग्लँड्स सक्रिय होतात आणि पुरळ निघतात. हार्मोनल बदल तर आम्ही थांबवू शकत नाही परंतु पुरळपासून मुक्ती मिळवू शकतो. बघू असे काही उपाय ज्याने ही समस्या दूर होण्यात मदत मिळू शकते:
बर्थ कंट्रोल पिल्स: आपण ही समस्या डर्मेटोलॉजिस्टला सांगाल तर ते बर्थ कंट्रोल पिल्स घेण्याचा सल्ला देतील. हे प्रभावी असून शरीरात एस्ट्रोजन स्तर वाढवतं. एस्ट्रोजनचे स्तर वाढल्यावर टेस्टोस्टेरोन स्तर कमी होतं ज्यांने पुरळची समस्या दूर होऊ शकते. या पिल्स तेलकट त्वचेवर ही प्रभावी ठरतात. परंतू यांचे साइड इफेक्ट्स असू शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय या पिल्स घेऊ नाही.
 
पोटैशियम- स्पेयरिंग डाइयरेटिक्स: बर्थ कंट्रोल पिल्स असर न करणार्‍या महिलांसाठी हे उपयोगी ठरेल. पोटैशियम- स्पेयरिंग डाइयरेटिक्स शरीरात टेस्टोस्टेरोनचे स्तर कमी करतं परंतू याचेही साइड इफेक्ट्स आहेत जसे अनियमित पीरियड्स, नरम ब्रेस्ट आणि थकवा अश्या समस्या उद्भवू शकतात.
 
सप्लीमेंट्स: शरीरात पोषक तत्त्वांची कमी झाल्यावर पुरळ निघतात. अशा स्थितीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल घेणे प्रभावी ठरेल. डॉक्टरांचा सल्ला घेऊन कमी पॉवरचे अँटी बायोटिक डोस घेऊ शकता.
 
नैसर्गिक उपाय: पुरेसं पाणी प्यायला हवं. अनेकदा पाण्याच्या कमीमुळे ही समस्या उद्भवते. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
तसेच पाळी येण्यापूर्वी मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
त्वचा ऑइली असल्यास दिवसातून दोन दा क्लिंजरने स्वच्छ करावे.
अती मेकअप करणे टाळावे. ऑइली कॉस्मेटिक्स वापरू नये.
सॅलिसिलिक अॅसिड आणि बेंजोइल परॉक्साइड आढळणारे फेसवॉशने चेहरा धुवावा.
आहारात ताज्या भाज्या आणि फळांचे सेवन करावे.
पाळी येण्यापूर्वी डेअरी पदार्थ सेवन करण्याची प्रमाण कमी करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेथी मुठीया