Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या

या कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या
आई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं: 
 
एंडोमेट्रोनिसिस
अनेकदा एंडोमेट्रोनिसिसमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. एंडोमेट्रोनिसिससमध्ये एंडोमेट्रियलची भिंत गर्भाशयाच्या आत नसून बाहेर बाजूला विकसित होऊ लागतात. ज्यामुळे वेदनायुक्त मासिक धर्म होतो. 
 
पीसीओ 
पीसीओमध्ये अंडाशय मध्ये आढळणारे लहान तरल पदार्थांने भरलेले सिस्ट हार्मोनल असंतुलनाचे कारण बनू शकतं ज्यामुळे अनओव्हुलेशनचा धोका असतो. पीसीओ स्त्रियांमध्ये वंध्यत्वचे प्रमुख कारण आहे. 
 
पेल्व्हिक इन्फ्लॉमॅटिक डिसीझ
हे यौन संचारीत रोगांपासून उत्पन्न संक्रमण असतात, याने स्त्रियांचे प्रजनन अंग प्रभावित होतात आणि गर्भधारणेत समस्या येते. याने अंडाशय, गर्भाशय, फेलोपियन ट्यूब आणि इतर महिला प्रजनन अंगांना नुकसान होऊ शकतं. 
 
थायरॉईड रोग
थायरॉईड आजारामुळे स्त्रियांच्या फर्टिलिटीवर प्रभाव पडतो. थायरॉईड हार्मोन सेलुलर फंक्शन, ओव्हुलेशन आणि प्रजनन क्षमतेला प्रभावित करतं. म्हणून प्लान करण्यापूर्वी थायरॉईड टेस्ट करवावी. 
 
औषधांचे सेवन 
अनेक असे औषधं असतात ज्याने फर्टिलिटीवर प्रभाव पडतो. त्यातून एक आहे गर्भनिरोधक औषधं. स्त्रिया अधिक काळापर्यंत याचे सेवन करत असल्यास वंध्यत्वाचे धोका वाढतो, म्हणून अश्या औषधांचे नियंत्रित प्रमाणातच सेवन केले गेले पाहिजे. 
 
असामान्य पिरियड
असामान्य किंवा अनियमित पिरियड वंध्यत्वाचे संकेत आहे. मासिक चक्र अधिक काळ अर्थात 35 दिवस किंवा त्याहून लहान अर्थात 21 दिवसाहून कमी असणे ओव्हुलेशनची समस्या दर्शवतं. अनेकदा स्वस्थ आहार, व्यायाम आणि औषधाने मासिक धर्माची अवधी नियमित करता येऊ शकते ज्याने गर्भधारणा करण्यास समस्या येणार नाही. 
 
फेलोपियन ट्यूब ब्लॉक होणे
फेलोपियन ट्यूब अंड्यांना अंडाशयातून गर्भाशयापर्यंत जाण्यास सुरक्षित मार्ग प्रदान करते. परंतू हे कार्य यशस्वीपणे पार पडत नसल्यास गर्भधारणा अशक्य आहे. नियमित ओव्हुलेशन असले तरी अवरोधित नलिका गर्भावस्थेला पूर्णपणे अशक्य बनवते. कारण आपले डिंब किंवा अंडी गर्भाशयापर्यंत पोहचत नाही आणि शुक्राणू (स्पर्म) देखील आपल्या अंड्यापर्यंत पोहचत नाही. 
 
आयू 
डिंबाची खराब गुणवत्ता आणि अनियमित डिंबोत्सर्जन, हार्मोनची कमी किंवा असंतुलन, अनियमित पीरियड्स सारख्या समस्यांमुळे प्रजनन क्षमतेवर प्रभाव पडतो. ह्या सर्व समस्या अनेकदा वयासंबंधी असतात. अधिक वयात गर्भधारणा धोकादायक असतं म्हणून डॉक्टर स्त्रियांना वेळेवारी गर्भधारणेचा सल्ला देतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shivrajyabhishek Sohala डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा!