Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्टडी रूममध्ये केवळ ही 1 वस्तू असली तर रिझल्टची भीती नाही

स्टडी रूममध्ये केवळ ही 1 वस्तू असली तर रिझल्टची भीती नाही
वास्तू शास्त्राप्रमाणे मुलांचे करिअर घडवताना चांगल्या निकालासाठी त्यांच्या खोलीत देवी सरस्वतीशी संबंधित एकतरी वस्तू असावी. येथे आम्ही 5 वस्तू सांगत आहोत ज्यातून एकही वस्तू मुलांच्या स्टडी रूममध्ये ठेवली तरी चांगले परिणाम हाती लागतील.
 
देवी सरस्वतीची मूर्ती: देवी सरस्वती ज्ञानाची देवी आहे. सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र स्टडी टेबलावर ठेवल्याने मुलांना यश हाती लागतं तसेच त्यांची उन्नती होते.
 
मोरपीस: मोरपीस ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. मुलांच्या खोलीत मोरपीस ठेवल्याने मुलांच्या बौद्धिक विकासात वाढ होते.

परीक्षेत टॉप करण्यासाठी
 
कमळाचे फुल: कमळाच्या फुलावर देवी सरस्वती वास करते. देवघरात आणि मुलांच्या खोलीत कमळाचं फुल ठेवायला हवं.
 
वीणा : ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वतीला वीणा अत्यंत प्रिय आहे. घरात वीणा ठेवल्याने नेहमी सुख आणि शांती नांदते. यामुळे मुलांमध्ये सर्जनशीलता वाढते.
 
हंस पक्ष्याचे चित्र : अभ्यासाच्या खोलीत देवी सरस्वतीचे वाहन हंस या पक्ष्याची मूर्ती किंवा चित्र ठेवायला हवे. याने अभ्यासात एकाग्रता येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 01.09.2018