Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रोध आहे मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू, अस करा त्यावर नियंत्रण

क्रोध आहे मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू, अस करा त्यावर नियंत्रण
क्रोध मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागामुळे मनुष्य स्वत:चे फार मोठे नुकसान करून बसतो आणि नंतर फक्त उरतो तो असतो पश्चात्ताप. क्रोधामुळे आपल्या लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि जन्मभराचे संबंध  एका क्षणात संपुष्टात येतात. वास्तूत सांगण्यात आले आहे काही सोपे उपाय ज्यामुळे तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता.  
 
वास्तूनुसार घाणीमुळे क्रोधाचा निर्माण होतो, म्हणून आपले घर किंवा प्रतिष्ठानाच्या स्वच्छतेचे विशेष लक्ष ठेवा.  घरात मकडीचे जाळे नसावे. घरात दोन्ही वेळेस उदबत्ती लावावी. घरात देवांना ठेवण्यासाठी योग्य व स्वच्छ जागेची निवड करावी. सकाळी सूर्याला जल अर्पित करावे. मंगळवारी बेसन आणि मसाल्यांचे दान केल्याने राग शांत राहतो. 
 
स्वयंपाकघरात गॅसच्या डावीकडे पाणी नाही ठेवायला पाहिजे. दक्षिणेकडे तोंड करून भोजन नाही करावे. बीमच्या खाली न तर बसायला पाहिजे ना झोपायला पाहिजे. असे झाल्याने घरात क्लेश वाढतो. घराच्या नाळीत जर अन्नाचे कण राहून जातात तर असे होऊ देऊ नये. चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने क्रोध शांत होतो. घरातील पूर्व दिशेत कुठलेही जड वस्तू ठेवू नये आणि घरात लाल रंगांचा वापर करू नये. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा!