Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Khakhra Recipe : गुजराती डिश खाखरा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या

Khakhra Recipe : गुजराती डिश खाखरा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या
, बुधवार, 14 जून 2023 (23:03 IST)
खाखरा गुजराती लोकांची आवडती डिश आहे. खाखरा दिसायला पापडासारखा, पातळ परांठासारखा, पण अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत असतो. बहुतेकांना ते चहासोबत खायला आवडते. जर तुम्हाला मसाला खाखरा खायला आवडत असेल तर जाणून घेऊया कसा बनवायचा.
 
साहित्य-
1 कप गव्हाचे पीठ, ½ कप दूध, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चिमूटभर हिंग, 2 चमचे बेसन, ¼ टीस्पून ओवा , ¼ टीस्पून जिरे, ¼ टीस्पून हळद, ¼ टीस्पून, 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे तेल , चवीनुसार मीठ, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची (ऐच्छिक)
 
कृती-
गुजराथी खाखरा बनवण्यासाठी एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन, ओवा, हिंग, जिरे, हळद, लाल तिखट, कसुरी मेथी, मीठ आणि 2 चमचे तेल घालून सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्या.
आता थोडे दूध घालून घट्ट पीठ मळून घ्या, त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालता येईल. नंतर पीठ झाकून 15-20 मिनिटे ठेवा. पीठ सेट झाल्यावर पिठाचे छोटे छोटे गोळे करून पोळी सारखे पण पातळ लाटून घ्या. 
 
आता तवा गरम करून त्यात खाखरा घालून हलके दाबून दोन्ही बाजूंनी हलके तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या. त्याचप्रमाणे सर्व खाखरे तयार करून एका डब्यात  ठेवा.
 
मग जेवायला आवडेल तेव्हा खाखरेवर तूप लावा, वर जीरावन मसाला शिंपडा आणि मस्त गुजराती खाखरे चा आस्वाद घ्या. हे खाखरे लवकर खराब होत नाहीत. आपण त्यांना बरेच दिवस साठवू शकता.




Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Yoga Tips: कमी वयात केस पांढरे होतात? या योगासनांचा सराव करा