Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाजरीची भाकरी- रेसिपी लिहून घ्या

Bajrichi Bhakari
, मंगळवार, 12 मार्च 2024 (08:24 IST)
भारतीय जेवणपद्धतीत बाजरीच्या भाकरीचे महत्व आहे. भाकरी ही हिवाळ्यात आरोग्यासाठी चांगली असते. बाजरीची भाकरीचे सेवन मानवी शरीरातल हाडांना मजबूत करते. तसेच संधिवात, हृदयाचे आजार, अर्थाइटिस, ब्लड प्रेशर, ऑस्टियोपीनिया इतर आजारांचा धोका होण्यापासून वाचवते. यात असणारे पोषक तत्व कैल्शियम, मैग्नीशियम, फॉस्फोरस, फाइबर, विटामिन बी, मैंगनीज आणि अँटीऑक्सीडेंट हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात. चला तर लिहून घ्या बाजरीची भाकरी- रेसिपी 
 
साहित्य-
250 ग्रॅम बाजरीचे पीठ 
चीमुठभर मीठ
कोमट पाणी 
आवश्यकतेनुसार तूप 
थोडा गूळ 
 
कृती-
बाजरीच्या पिठात मीठ मिक्स करून कोमट पाण्याने हे पीठ मळुन गोळा बनवून घ्यावा. 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेऊन दया मग आता बिजवलेला गोळा चांगला मळुन त्याचे गोळे तयार करून घ्या. पोळपाटावर बाजरीचे थोडेसे पीठ टाकून एक गोळा ठेवा हाताने थापून भाकरी बनवा. मग तीला तव्यावर टाका व वरच्या बाजूने पाण्याचा हात फिरवावा. आता भाकरी दुसऱ्या बाजुने शेकली गेल्यावर पहिल्या बाजूने पलटवून दोन्ही बाजुने शेकुन घ्यावी. तसेच आता तवा काढून भाकरी गॅस वर चांगल्याप्रकारे शेकुन घ्यावी. भाकरी छान फुलल्यावर त्यावर तूप लावावे व गरम गरम भाकरी सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Home Remedies : पिवळे दात या समस्येवरील उपाय