Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Hate Speech प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मौलाना मुफ्ती यांना अटक

Mufti Salman Azhari
Maulana Salman Azhari गुजरातमधील जुनागढ येथे द्वेषपूर्ण भाषण दिल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी रविवारी मुंबई स्थित इस्लामिक धर्मोपदेशक मुफ्ती सलमान अझरींना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. काही दिवसांपूर्वी जुनागढमध्ये दिलेल्या भाषणात गुजरात पोलिसांनी मुस्लिम मौलाना आणि इतर दोन लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी रविवारी संध्याकाळी मुफ्ती सलमान अजहरी यांना ताब्यात घेतले.
 
मुफ्ती सलमान अजहरी यांना मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांच्या जमावाने पोलीस ठाण्याला बाहेरून घेराव घातला होता. सध्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मौलानांच्या वकिलाने सांगितले की, मुफ्ती सलमान तपासात सहकार्य करण्यास पूर्णपणे तयार आहेत. मात्र याप्रकरणी पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण: मौलाना यांच्यावर जुनागढमध्ये 31 जानेवारीला एका कार्यक्रमादरम्यान भडकाऊ भाषण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुफ्ती सलमान, कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद युसूफ मलिक आणि अझीम हबीब ओडेदरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153 बी आणि 505 (2) अंतर्गत एफआयआर नोंदवला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ENG : भारताने दुसरी कसोटी 106 धावांनी जिंकली