Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झारखंडमधील आगीत 14 मृत्युमुखी

fire
, बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (08:38 IST)
झारखंडमधील धनबाद शहरातील आशीर्वाद नावाच्या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
धनबाद शहरात शक्ती मंदिराजवळ ही इमारत आहे. काल 31 जानेवारी रोजी या इमारतीला संध्याकाळी आग लागली. आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दल तसेच प्रशासकीय अधिकारी तेथे दाखल झाले. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.
 
“धनबाद येथील आशीर्वाद इमारतीत लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दु:खद आहे. जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत”, अशी माहिती झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली आहे.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवारांचे समर्थक आमदाराचा मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास