Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अॅम्बेसेडर कार आता फ्रेंच कंपनीच्या मालकीची होणार

अॅम्बेसेडर कार आता फ्रेंच कंपनीच्या मालकीची होणार
दहा वर्षांपूर्वी श्रीमंतीचं स्टेटस मानली जाणारी अॅम्बेसेडर कार आता फ्रेंच कंपनीच्या मालकीची होणार आहे. अॅम्बेसेडर या ब्रँडची ‘प्युजो’ या फ्रेंच कंपनीला विक्री करण्याचा निर्णय हिंदुस्तान मोटर्स या कंपनीनं केला आहे. अवघ्या 80 कोटी रुपयांमध्ये हा करार करण्यात आला. 
 
प्युजो कंपनी यापुढे कार निर्मितीसाठी अॅम्बेसेडर या ब्रँडचा वापर करणार का हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या कराराच्या माध्यमातून मिळालेल्या 80 कोटी रुपयांमधून कर्मचारी आणि इतरांची देणी भागवली जाणार असल्याचं सी. के. बिर्ला ग्रुपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. एकेकाळी पंतप्रधान, राजकीय नेते, मोठे अधिकारी, अभिनेते या सगळ्यांनीच अॅम्बेसेडर गाडीला पसंती दिली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स जिओमुळे आयडियाला फटका